ग्रामीण बस फेऱ्या बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:18 AM2021-03-10T04:18:25+5:302021-03-10T04:18:25+5:30
विरुद्ध बाजूने वाहतूक परभणी : शहरात बाजारपेठ भागातील रस्त्यांवर सर्रास विरुद्ध बाजूने वाहतूक केली जात आहे. याविरुद्ध पोलीस प्रशासन ...
विरुद्ध बाजूने वाहतूक
परभणी : शहरात बाजारपेठ भागातील रस्त्यांवर सर्रास विरुद्ध बाजूने वाहतूक केली जात आहे. याविरुद्ध पोलीस प्रशासन कारवाई करीत नसल्याने हा प्रकार बळावला आहे.
रस्त्याची दुरवस्था
परभणी : पारदेश्वर मंदिर ते जुना पावर हाऊस या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सिमेंट काँक्रिट रस्त्यावर मधोमध भेग पडली असून, अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
जलवाहिनीसाठी खोदकाम
परभणी : शिवाजीनगर भागात जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम केले आहे. त्यामुळे पाणी पुरवठा योजनेचे काम अजूनही शहरात पूर्ण झाले नसल्याचे स्पष्ट होत आहे.
उड्डाण पुलाचे काम संथगतीने
परभणी : रेल्वे स्थानकाला लागूनच असलेल्या विद्यापीठ गेटजवळ उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे. हे काम संथगतीने होत असून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे.