करडई पीक नामशेष होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:22 AM2020-12-30T04:22:34+5:302020-12-30T04:22:34+5:30

तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर मुदगल येथे बंधारा आहे. तसेच माजलगाव उजवा कालव्याचे पाणी तालुक्यात उपलब्ध होण्यापूर्वी या भागात रब्बी ...

Safflower crop on the verge of extinction | करडई पीक नामशेष होण्याच्या मार्गावर

करडई पीक नामशेष होण्याच्या मार्गावर

Next

तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर मुदगल येथे बंधारा आहे. तसेच माजलगाव उजवा कालव्याचे पाणी तालुक्यात उपलब्ध होण्यापूर्वी या भागात रब्बी हंगामात हरभरा, ज्वारी, गहू, करडई पिकांची लागवड केली जाते. रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा या पिकांच्या प्रत्येकी सहा ओळीनंतर करडईचाक पेरा होतो. पिकांची निवड करताना कमी पाण्यात कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या आणि अवर्षणाचा ताण सहन करणाऱ्या पिकांचा विचार तालुक्यातील शेतकरी करतात.त्यामुळे मोठ्या प्रमाणात या भागात करडई पिकाची लागवड केली जात असे. मात्र सद्यस्थितीत करडई पिकाची लागवड होताना दिसत नाही. या पिकाचे क्षेत्र घटण्याची काही प्रमुख कारणे आहेत. पाऊस, रोगांचा प्रादुर्भाव तसेच इतर स्पर्धात्मक पिके ज्वारी, सूर्यफूल व करडईचे बाजार भाव इतर पिकांच्या मानाने कमी असल्याने शेतकरी अधिक फायदा मिळणाऱ्या पिकांकडे वळले आहेत. त्यामुळे करडई पिक तालुक्यातून हद्दपार झाले आहे. आता रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात हरभरा घेतला जात आहे. हरभरा जास्त उत्पादन देणारे पीक ठरत आहे. कमी खर्चात आणि कमी वेळेत हरभरा जास्त उत्पादन देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी करडई पिकाची लागवड थांबवली आहे. तालुक्यात मुदगल बंधाऱ्यातून तसेच माजलगाव उजवा कालव्याचे पाणी मिळण्यास सुरुवात झाल्यावर शेतकऱ्यांनी बागायती पिके घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे करडई पीक सोनपेठ तालुक्यातून नामशेष झाले आहे.

केवळ एक टक्का पिकाची लागवड.

सोनपेठ तालुक्यातील चार महसूल मंडळात ५५५ सरासरी क्षेत्र हे करडई पिकासाठी राखीव आहे. परंतु, करडई पिकांचा पेरा केवळ १.४४ टक्के एवढाच झाला आहे. त्यामुळे गेल्या तीस वर्षापूर्वी सोनपेठ तालुक्यात करडई पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात असताना सद्यस्थितीत करडई पीक नामशेष होण्यास सुरुवात झाली आहे.श

Web Title: Safflower crop on the verge of extinction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.