साहेब, आता तरी रस्ता द्या! आश्वासनांना कंटाळलेले कोल्हेवाडी ग्रामस्थ चिखलात लोळले
By मारोती जुंबडे | Published: September 10, 2024 06:59 PM2024-09-10T18:59:45+5:302024-09-10T19:00:32+5:30
कोल्हेवाडी ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन, तरीही प्रशासन दखल घेईना
- विनायक देसाई
पूर्णा: गावाला जायला 75 वर्षापासून रस्ता नाही. दीड किलोमीटर रस्ता मिळावा यासाठी वारंवार प्रशासनाला साकडे घालण्यात आले मात्र प्रशासकीय काम आणि सहा महिने थांब या म्हणीचा अनुभव कोल्हेवाडी ग्रामस्थांना आला अखेर प्रशासनाच्या आश्वासनाला कंटाळलेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी 11 वाजता रस्त्यावरील चिखलात लोळत अनोखे आंदोलन केले. आता तरी प्रशासन या रस्ता दुरुस्तीचे दिलेले आश्वासन पूर्ण करेल का? असा सवाल चिखलात लोळल्यानंतर तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांसह राष्ट्रीय महामार्गांची मोठी दुरवस्था झाली आहे. अनेक वेळा या रस्त्यांवरील खड्डा चुकविण्याच्या नादात वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागला. तर ग्रामीण भागात रस्ते चक पांदण रस्ते बनले आहेत, अशातच पूर्णा तालुक्यातील कोल्हेवाडी ग्रामस्थांना स्वातंत्र्याच्या 75 वर्षापासून गावाला जायला रस्ता नाही. कानड खेड ते कोल्हेवाडी हा दीड किलोमीटर चा रस्ता किमान मुरूम टाकून तरी पक्का करून द्यावा असे साखरे शासन आणि प्रशासनाला ग्रामस्थांनी वारंवार घातले त्यात लोकप्रतिनिधींना तर अनेकदा विनवण्या केल्या मात्र प्रशासकीय काम पण शासनाचे दुर्लक्ष याचा मोठा फटका कोल्हेवाडी ग्रामस्थांना बसला. त्यामुळे आजही गुडघ्या इतका चिखल तुडवत ग्रामस्थांना कोल्हेवाडी गाव गाठावे लागते.
आम्ही चिखलात लोळलोत; साहेब, आता तरी रस्ता द्या! परभणी जिल्ह्यातील कोल्हेवाडी ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन #parabhaninewspic.twitter.com/cGkFdAdoU1
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) September 10, 2024
रस्त्याला कंटाळलेल्या ग्रामस्थांनी अखेर 10 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता शासनाच्या निषेधार्थ घोषणा देत रस्त्यावरील चिखलात लोळून घेतले दुपारपर्यंत चाललेल्या या आंदोलनाकडे प्रशासकीय अधिकारी फिरकलेच नाहीत अखेर चिखलाने भरलेले अंग घेऊन ग्रामस्थ तहसीलदारांच्या कक्षात गेले त्यानंतर साहेब आम्ही रस्ता मिळावा म्हणून चिखलात लोळलो किमान आता तरी आम्हाला पक्का रस्ता द्यावा असे साकडे घातले या आंदोलनात सचिन नशीर अजय खंदारे सुबोध खंदारे प्रदुध काळे वैभव जाधव सुरेश कदम माणिक बार्शी नवनाथ भालेराव सतीश पवार नरारी पवार ज्ञानेश्वर पवार शिवाजी पवार चंद्रकांत पवार माधव खरबे दतराव पारटकर खंडू पाटील हरिभाऊ डहाळे गजानन पवार संतोष वैद्य गणेश भालेराव पवन खरबे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.