साई जन्मभूमी वाद : महाआरतीच्या निमित्ताने पाथरीच्या ग्रामसभेत महाआघाडीच्या नेत्यांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 01:33 PM2020-01-21T13:33:14+5:302020-01-21T13:34:20+5:30
पाथरीकरांना अद्यापही मुख्यमंत्र्यांचे निमंत्रण नाही
पाथरी : साई जन्मस्थळवरून सुरू झालेला वाद थांबायला तयार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिर्डीच्या शिष्टमंडळाची चर्चा केली त्या ठिकाणी पाथरी हे जन्मस्थान नसून तीर्थक्षेत्र असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी बैठकीत केल्यामुळे शिर्डीकरांचा दिलासा मिळाला असला तरी पाथरीकर यांनी हे वक्तव्य मान्य केलेली नाही. एखाद्या वादावर दोन्ही बाजू ऐकून निर्णय घ्यावा अशी मागणी पाथरीकरांनी केली आहे.
या वादावर पुढील भूमीला मांडण्यासाठी मंगळवारी पाथरी येथील येथे साई मंदिरामध्ये आज महाआरतीच्या निमित्ताने महाआघाडीतील नेत्यांची बैठक होत आहे. महाआरतीनंतर लगेच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या बैठकीला सुरुवात झाली. बैठकीमध्ये शिवसेना खासदार संजय जाधव व आमदार राहुल पाटील, राष्ट्रवादीचे आमदार तथा विश्वस्त बाबाजानी दुर्राणी, काँग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि त्याचबरोबर साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.