गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:25 AM2021-02-23T04:25:49+5:302021-02-23T04:25:49+5:30

दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्रात याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती साजरी करताना उत्सव समितीचे ...

Sakade to the Chief Minister to withdraw the crime | गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे साकडे

गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे साकडे

Next

दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्रात याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती साजरी करताना उत्सव समितीचे पदाधिकारी तसेच मार्गदर्शक यांच्याकडून सर्व नियमांचे पालन करण्यात आले. मात्र स्थानिक पोलिसांनी या उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांवर तसेच मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांवर १९ फेब्रुवारी रोजी राज्यभरात गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष गोविंद घाडगे, सुनील जाधव, रामप्रसाद काळे, आमिर अन्सारी, महादेव शिंदे, कृष्णा शिंदे, ज्ञानेश्वर चांगभले, राजूभाऊ होगे, माउली आंबेगावकर, आकाश काळे, शुभम काळे, सुनील कापसे, मोहन माहीपाल, कैलास दळवे, माउली शिंदे यांच्या सह्या आहेत.

Web Title: Sakade to the Chief Minister to withdraw the crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.