परभणी मनपाच्या दुर्लक्षामुळे वाढली पाण्याची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:33 PM2019-02-25T23:33:49+5:302019-02-25T23:33:54+5:30

शहरामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना महापालिकेने अद्यापही पर्यायी व्यवस्था उपलब्ध केली नसल्याने नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. शहरामध्ये पियाजो आॅटोरिक्षातून दररोज मोठ्या प्रमाणात पाण्याची विक्री सुरु झाली आहे.

Sales of increased water due to neglect of Parbhani Municipal Corporation | परभणी मनपाच्या दुर्लक्षामुळे वाढली पाण्याची विक्री

परभणी मनपाच्या दुर्लक्षामुळे वाढली पाण्याची विक्री

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना महापालिकेने अद्यापही पर्यायी व्यवस्था उपलब्ध केली नसल्याने नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. शहरामध्ये पियाजो आॅटोरिक्षातून दररोज मोठ्या प्रमाणात पाण्याची विक्री सुरु झाली आहे.
उन्हाळ्यामध्ये दरवर्षी परभणी शहरातील ठराविक भागांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. राहटी येथील बंधाऱ्यातून शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र अनेक भागामध्ये या योजनेची जलवाहिनी पोहचलेली नाही. सहा महिन्यांपूर्वी काही भागात नव्याने जलवाहिनी टाकण्यात आली. मात्र या जलवाहिनीला मुख्य वाहिनीशी जोडले नसल्याने नागरिकांना पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. सद्यस्थितीला अनेक प्रभागांमध्ये टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत असली तरी महापालिकेकडून अद्यापही टँकर सुरु करण्यात आले नाहीत. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
नळ योजना उपलब्ध नसल्याने हातपंपावर भिस्त असलेल्या अनेक वसाहतींमधील नागरिक खाजगी व्यावसायिकांकडून पाणी विकत घेऊन दररोजची गुजराण करीत आहेत. पाण्याची मागणी वाढत चालल्याने खाजगी व्यावसायिकांचा व्यवसायही आता तेजीत आला आहे. शहरामध्ये ४० ते ५० खाजगी पियाजो आॅटोरिक्षांमधून शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो. या पियाजो आॅटोला मोटारपंप लावलेला असून १ हजार लिटरची टाकी दीडशे रुपयांना तर २ हजार लिटरची टाकी ३०० रुपयांना विक्री केली जात आहे.
परभणी शहरात खाजगी विक्रेत्यांकडून पाण्याची विक्री सुरु झाली असून आगामी काळात ही परिस्थिती आणि गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खाजगी विक्रेत्यांचीही संख्याही वाढण्याची चिन्हे आहेत. दोन वर्षांपासून या खाजगी विक्रेत्यांना जलकुंभावरुन पाणी दिले जात नसल्याने शहर परिसरातील शेतांमधून पाणी आणून हे पाणी विक्री केले जात आहे. महापालिकेने वेळेत टँकर सुरु केले तर पाणीटंचाई शिथील होऊन नागरिकांना दिलासा मिळू शकतो. मात्र महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना पाणीटंचाई बरोबच आर्थिक भूर्दंडही सहन करावा लागत आहे.
टंचाई निवारण्याची कामे ठप्प
४शहरातील टंचाई दूर करण्यासाठी मनपाने जिल्हा प्रशासनाला कृती आराखडा सादर केला आहे. या आराखड्यास अद्याप मंजुरी मिळाली नसल्याने ही कामे ठप्प आहेत. शहरवासियांना टँकरने पाणीपुरवठा करणे, तात्पुरत्या स्वरुपात जलवाहिनी टाकून टंचाईग्रस्त भागात पाणी उपलब्ध करुन देणे, हातपंपाची दुरुस्ती, नवीन विंधन विहीर घेणे ही कामे अजूनही सुरु नाहीत. त्यामुळे पाणीटंचाईमध्ये भर पडली आहे. महापालिकेने जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करुन टंचाई निवारण्याच्या कामाला सुरुवात करण्याची गरज निर्माण झाली आहे.
४टंचाई निवारणाचा निधी उपलब्ध नसल्याने कामे ठप्प असली तरी जलवाहिनीची गळती रोखण्याचे काम महापालिका हाती घेऊ शकते; परंतु, प्रत्येक आवर्तनाच्या वेळी हजारो लिटर पाणी वाया जात असताना मनपाकडून जलवाहिनीच्या गळती, दुरुस्तीची कामे केली जात नसल्याने टंचाईत भर पडत आहे.
नळयोजना पडली अपुरी
४शहराला राहटी येथील बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जातो. ही योजना ३० वर्षापूर्वीची जुनी आहे. सध्या शहराची लोकसंख्या दुप्पटीने वाढली आहे. तरीही याच योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे शहराच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचते करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय वाढत आहे. तसेच सद्यस्थितीला १२ ते १३ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने शहरामध्ये पाणीटंचाई वाढली आहे.
मनपाच्या टँकरने पाणी पुरवठा
४शहरामध्ये महापालिकेने मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला नसला तरी मनपाच्या टँकरने पाणी विकत दिले जात आहे. शहरातील प्रभावती नगर येथील जलकुंभावरुन खाजगी विक्रेत्यांना पाणी दिले जात नाही, अशी माहिती देण्यात आली. मात्र दररोज चार ते पाच टँकर महापालिकेची नियमानुसार असलेली रक्कम भरुन टँकरने पाणी नेत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे मनपाने मोफत पाणीपुरवठा सुरु केला नसला तरी टँकरच्या सहाय्याने पैसे भरुन पाणी दिले जात असल्याचे दिसत आहे.

Web Title: Sales of increased water due to neglect of Parbhani Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.