रोहयोतून मिळणार ४०० सिंचन विहिरींना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:31 AM2021-03-13T04:31:14+5:302021-03-13T04:31:14+5:30
पालम : येथील पंचायत समितीमध्ये महाराष्ट्र रोजगार हमी योजना अंतर्गत शासनाने ४०० सिंचन विहिरींचे उद्दिष्ट दिले आहे. यापैकी जवळपास ...
पालम : येथील पंचायत समितीमध्ये महाराष्ट्र रोजगार हमी योजना अंतर्गत शासनाने ४०० सिंचन विहिरींचे उद्दिष्ट दिले आहे. यापैकी जवळपास २२५ विहिरींना मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित विहिरींना मंजुरी देण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे
शासनाने यावर्षी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडील सिंचन विहीर मंजुरीचे प्रशासकीय मंजुरीचे आदेश काढून पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी यांना दिले आहेत. त्यामुळे तालुका स्तरावर कामाला गती प्राप्त झाली आहे. लोकसंख्येने लहान ग्रामपंचायतला ५ तर मोठ्या ग्रामपंचायतला १० अशी सिंचन विहिरींचे मंजुरी उद्दिष्ट गावनिहाय पंचायत समितीला देण्यात आले आहे. नवीन कामांना मंजुरी देताना जुनी मंजुरी, अपूर्ण कामे गृहित धरूनच नवी कामे मंजुरी देण्यात येत आहेत. २२५ विहिरींना मंजुरी देण्यात आली असून ५० प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहेत. तर शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या प्रस्ताव तपासणी करण्यात येत आहे. यावर्षी करिता ४०० विहिरींना मंजुरी मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे बागायती क्षेत्र वाढीस हातभार लागणार आहे. या योजनेतून ३ लाखांचा निधी विहीर कामासाठी प्रत्येक लाभार्थ्याला उपलब्ध होणार आहे.