वाळू तस्कर पोलिसांवर पडले भारी; अंगावर घातले भरधाव ट्रॅक्टर, शेतपिकांचे नुकसान करत फरार

By ज्ञानेश्वर भाले | Published: January 8, 2024 02:09 PM2024-01-08T14:09:31+5:302024-01-08T14:09:57+5:30

वाळू खाली टाकत भरधाव ट्रॅक्टरने दोन जणांच्या शेतपिकांचे केले लाखोंचे नुकसान

Sand smugglers fall heavily on the police; Absconding by damaging crops with a speeding tractor | वाळू तस्कर पोलिसांवर पडले भारी; अंगावर घातले भरधाव ट्रॅक्टर, शेतपिकांचे नुकसान करत फरार

वाळू तस्कर पोलिसांवर पडले भारी; अंगावर घातले भरधाव ट्रॅक्टर, शेतपिकांचे नुकसान करत फरार

सेलू (परभणी) : सेलू ठाण्याचे पोलीस शिपाई यांनी शनिवारी सकाळी साडेनऊला वालूर परिसरात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा पाठलाग करतांना ट्रॅक्टर चालकांनी भरधाव वेगाची प्रथमतः पोलीसांना भिती धाखवून रेती खाली टाकून दिली. दरम्यान या ट्रॅक्टरने पुढे दोन जणांच्या शेतातील २ लाख ५० हजार रूपयेच्या पिकांचे नुकसान, एकाच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिन आरोपीविरुद्ध सेलू ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या पोलिस शिपायांने सुट्टीवर असलेल्या पोलीस निरीक्षकांच्या संपर्कात राहत ही कारवाई केली अशी माहिती पुढे येत आहे. अखेर वाळू तस्करी करणारे पोलीसांनाच पडले भारी अशी चर्चा सुरू आहे.
                  
पोलिस शिपाई अमोल नागनाथ वाडेकर यांनी वालूर परिसरात शनिवारी सकाळी  बबन धुळगुंडे, गोपाळ पाढरे व अन्य एक इसम हे त्यांचे ताब्यातील हिरव्या रंगाचा जॉनडियर कंपनीचे ट्रॅक्टर व फिकट लालसर रंगाचे ट्रॉलीमध्ये विनापरवाना बेकायदेशीर रित्या चोरटी वाळू वहिती करीत असताना मिळून आले. त्यांना थांबण्याचा इशारा केला असता न थांबता भरधाव वेगात ट्रक्टर अंगणवाडीकडे जाणारे रोडने पळवुन चालु स्थिती जॅकने वाळू रोडवर टाकली व ट्रॅक्टर घेऊन डुघरा रोडने भरधाव वेगाने पळुन गेले. पोलिस शिपाई वाडेकर यांचे फिर्यादीवरून प्रभारी पो.नी. विजय कांबळे यांचे आदेशाने तिन जणांवर गुन्हा दाखल केला. पोलीस जमादार अशोक हींगे यांचेकडे तपास दिला आहे.

अन् आडीच लाखाचे शेतपिकांचे नुकसान
शैलेश सुरेन्द्र तोष्णीवाल यांनी सेलू ठाण्यात फिर्याद दिली की, बबन धुळगुंडे, गोपाळ पाढरे व एक सोबतचा इसम यांनी ६ जानेवारीला त्यांचे ताब्यातील हिरव्या रंगाचे  भरधाव ट्रॅक्टर ( एम एच १२ पी ५८६७) हे फिर्यादीचे शेतात अनाधिकृतरीत्या प्रवेश करून त्याचे शेतातील कापस पिकाचे अंदाजे १ लाख ५० हजाराचे नुकसान केले. याप्रकरणी प्रभारी पोनी एस.टी. चव्हाण यांचे आदेशाने तीन जणांवर गुन्हा दाखल केला. पोलीस हवालदार जाधव यांचेकडे तपास दिला आहे.
              
दूसरा गुन्हा दाखल 
या प्रकरणात आणखीन एक फिर्याद  कृष्णा दत्ता भोगावकर यांनी ठाण्यात दिली की, बबन धुळगुंडे, गोपाळ पाढरे व एक सोबतचा इसम यांनी ६ जानेवारीला त्यांचे ताब्यातील हिरव्या रंगाचे भरधाव ट्रॅक्टर हे फिर्यादी हे त्यांनी बटइने केलेल्या शेतामध्ये ज्वारीचे पीकास पाणी देत असतांना शेतात अनाधीकृत प्रवेश करून व त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर भरधाव गेवात चालवुन पिकाचे नुकसान (अंदाजे १लाख) करीत असतांना फिर्यादीने थांबविण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादीचे अंगावर जिवे मारण्याच्या उदेशाने ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. प्रभारी पो.नी.विजय कांबळे यांचे आदेशाने तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनी पंडीत यांचेकडे तपास दिला आहे.

Web Title: Sand smugglers fall heavily on the police; Absconding by damaging crops with a speeding tractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.