आरटीपीसीआरसाठी सरसावले आरोग्य केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:41 AM2021-01-13T04:41:34+5:302021-01-13T04:41:34+5:30

परभणी : आर.टी.पी.सी.आर.च्या चाचण्या वाढविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केल्यानंतर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य ...

Sarasawale Health Center for RTPCR | आरटीपीसीआरसाठी सरसावले आरोग्य केंद्र

आरटीपीसीआरसाठी सरसावले आरोग्य केंद्र

Next

परभणी : आर.टी.पी.सी.आर.च्या चाचण्या वाढविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केल्यानंतर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र सरसावले असून ९ दिवसांत ८ हजार १८९ नागरिकांचे स्वॅबनमुने घेण्यात आले आहेत.

कोरोनाचा संसर्ग घटला असला तरी याच आजाराच्या दुसऱ्या लाटेची भीती कायम आहे. त्यामुळे निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकतो. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सूचनेनुसार जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व आरोग्य कर्मचारी, जि. प. कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्याचे आवाहन केले होते. तसेच ग्रामीण भागातही आरटीपीसीआर चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत केवळ जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयातच स्वॅब नमुने घेतले जात होते. मात्र, सीईओ टाकसाळे यांच्या आवाहनानंतर १ जानेवारीपासून प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही स्वॅब नमुने घेण्याचे काम नुसतेच सुरू केले नाही तर या कामाला गतीही देण्यात आली. १ ते ९ जानेवारी या काळात ८ हजार १८९ नागरिकांचे स्वॅब नमुने घेण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रांत केलेल्या स्वॅब तपासण्यांमुळे जिल्ह्यातील आरटपीसीआरचा आकडा झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे रॅपिड तपासण्यांच्या तुलनेत आता आरटपीसीआरच्या तपासण्या वाढत चालल्या आहेत. तपासण्यांची संख्या वाढल्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग किती प्रमाणात आहे, याचाही अंदाज बांधणे सोयीचे झाले आहे. दररोज ८०० ते ९०० अहवालांत केवळ ८ ते ९ रुग्ण पॉझिटिव्ह येत असल्याने दररोज रुग्ण आढळण्याचे प्रमाणे केवळ १ टक्क्यावर आले आहे.

सर्वाधिक तपासण्या केलेले केंद्र

जांब ३८०

पिंगळी ५६३

दैठणा ४९५

झरी ३३६

पेडगाव ३३२

राणीसावरगाव ४०१

ताडकळस ५०२

कावलगाव ४८३

रावराजूर ८२७

चाटोरी ६१८

परभणी तालुक्यात सर्वाधिक रुग्ण

प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर केलेल्या आरटीपीसीआर तपासण्यांमध्ये परभणी तालुक्यात सर्वाधिक ४२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले. त्याचप्रमाणे पाथरी तालुक्यात १५, पूर्णा ६, जिंतूर १४, गंगाखेड २७, मानवत ७, पालम ८, सेलू २० आणि सोनपेठ तालुक्यात ४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण १४३ रुग्ण ग्रामीण भागात पॉझिटिव्ह नोंद झाले आहेत.

Web Title: Sarasawale Health Center for RTPCR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.