साडेबारा हजारांची लाच स्वीकारताना सरपंच, मंडळ अधिकारी चतुर्भुज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:18 AM2021-03-23T04:18:43+5:302021-03-23T04:18:43+5:30

तालुक्यातील वागदरा येथील तक्रारदाराच्या आजोबांच्या नावाने असलेल्या शेतीचा तडजोड फेरफार न्यायालयाच्या आदेशाने वडील व चुलत्याच्या नावाने करण्यासाठी राणीसावरगाव मंडळाचे ...

Sarpanch, Mandal officer Chaturbhuj accepting a bribe of Rs | साडेबारा हजारांची लाच स्वीकारताना सरपंच, मंडळ अधिकारी चतुर्भुज

साडेबारा हजारांची लाच स्वीकारताना सरपंच, मंडळ अधिकारी चतुर्भुज

Next

तालुक्यातील वागदरा येथील तक्रारदाराच्या आजोबांच्या नावाने असलेल्या शेतीचा तडजोड फेरफार न्यायालयाच्या आदेशाने वडील व चुलत्याच्या नावाने करण्यासाठी राणीसावरगाव मंडळाचे मंडळ अधिकारी बालाजी संभाजी लटपटे व वागदरा येथील सरपंच गोविंद दत्तराव सानप यांनी १५ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती १२ हजार ५०० रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराला लाच देणे पटत नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या प्रकरणी तक्रार केली होती. त्यावरून पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक भरत हुंबे, पोलीस निरीक्षक अमोल कडू, कर्मचारी अनिल कटारे, अनिरुद्ध कुलकर्णी, सचिन धबडगे, जहागीरदार, हनुमंते, शेख मुखीद, माणिक चट्टे, शेख मुक्तार, मपोशि दंडवंते, सारिका टेहरे, चालक कदम, चौधरी, आदींच्या पथकाने २२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सापळा लावला. त्यावेळी मंडळ अधिकारी बालाजी संभाजी लटपटे याच्या व्यंकटेशनगर परिसरातील घरी सरपंच गोविंद सानप यांच्यामार्फत तक्रारदाराकडून १२ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी बालाजी लटपटे व वागदरा येथील सरपंच गोविंद सानप यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Sarpanch, Mandal officer Chaturbhuj accepting a bribe of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.