सरपंचांनी अभ्यास करून गावचा विकास साधावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:30 AM2021-02-18T04:30:30+5:302021-02-18T04:30:30+5:30
परभणी : शासन निर्णयांचा व्यवस्थित अभ्यास करून त्याप्रमाणे सरपंचांनी गावाचा विकास साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ...
परभणी : शासन निर्णयांचा व्यवस्थित अभ्यास करून त्याप्रमाणे सरपंचांनी गावाचा विकास साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले आहे. परभणी पंचायत समितीच्यावतीने ‘आमचा गाव, आमचा विकास’ कार्यक्रमांतर्गत गाव विकास आराखड्यासंबंधी १७ फेब्रुवारी रोजी तालुकास्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन केले होेते. या प्रशिक्षणात शिवानंद टाकसाळे यांनी सरपंचांशी संवाद साधला. ते म्हणाले, ग्रामीण भागातील जलस्रोतांचे बळकटीकरण करून प्रत्येक कुटुंबाला पाणी कसे मिळेल? यासाठी प्रयत्न करायला हवेत. शेतशिवाराबरोबरच गावाचा शिवारदेखील स्वच्छ व सुंदर कसा होईल, यासाठी प्रयत्न करावेत. गावामध्ये शेतीविषयक विविध योजनांची आखणी करावी. गावाच्या सन्मानासाठी प्रत्येकाने शौचालयाचा नियमित वापर होण्यासाठी सरपंच मंडळींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी टाकसाळे यांनी केले.
यावेळी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, कार्यकारी अभियंता गंगाधर यंबडवार, गटविकास अधिकारी अनुप पाटील, विस्ताराधिकारी स्वप्निल पवार, शैलेंद्र पानपाटील, जी. एम. गोरे यांच्यासह तालुक्यातील ग्रामसेवक आणि सरपंचांची उपस्थिती होती.