जायकवाडीच्या पाण्याने शेतकऱ्यांत समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:15 AM2021-01-18T04:15:29+5:302021-01-18T04:15:29+5:30
रस्त्याचे काम संथगतीने परभणी : जिंतूर रस्त्याचे काम संथगतीने होत असून, खराब रस्त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. मागील दोन ...
रस्त्याचे काम संथगतीने
परभणी : जिंतूर रस्त्याचे काम संथगतीने होत असून, खराब रस्त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. मागील दोन वर्षापासून या रस्त्याचे काम संथगतीने होत आहे. काही भागात हे काम अर्धवट झाले असून, वाहनधारकांना सध्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
राहटी पुलाच्या कामाला सुरुवात
परभणी : परभणी-वसमत रस्त्यावरील राहटी बंधाऱ्याजवळ नवीन पुलाच्या उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. राहटी येथे जुना पूल अस्तित्वात आहे. मात्र राष्ट्रीय महामार्गांतंगत या भागात मोठ्या रुंदीचा पूल उभारावा लागणार आहे. सध्या बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंकडील रस्त्याची कामे हाती घेण्यात आली असून, पूल उभारण्यासाठीही खोदकाम सुरू करण्यात आले आहे.
सवारी रेल्वे गाड्या सुरू करा
परभणी : नांदेड-मनमाड या मार्गावर सवारी रेल्वे गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी ग्रामीण भागातील प्रवाशांकडून केली जात आहे. रेल्वे प्रशासनाने सध्या विशेष रेल्वे सुरू केल्या आहेत. या रेल्वेने प्रवास करण्यासाठी आरक्षण करूनच प्रवास करावा लागतो. त्यामुळे नांदेड, जालना, सेलू, मानवत यासारख्या जवळच्या गावांना जाण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागत आहेत. तेव्हा सवारी रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी प्रवाशांतून केली जात आहे.
भाजीमंडईत ग्राहकांची वाढली गर्दी
परभणी : शहरातील भाजीमंडई भागात ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून फिजिकल डिस्टन्सचे वारंवार उल्लंघन केले जात आहे. अनेक नागरिक मास्कचा वापर न करताच बाजारपेठेत दाखल होत असून, त्यांच्याविरुद्ध कारवाईही होत नाही.