५९५ नागरिकांच्या शनिवारी चाचण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:17 AM2021-03-14T04:17:21+5:302021-03-14T04:17:21+5:30
कोरोना रुग्णांसाठी दीड हजार खाटा परभणी : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी खाजगी आणि शासकीय दवाखान्यांमध्ये १ हजार ८३४ ...
कोरोना रुग्णांसाठी दीड हजार खाटा
परभणी : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी खाजगी आणि शासकीय दवाखान्यांमध्ये १ हजार ८३४ खाटांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी १ हजार ५०७ खाटा सध्या रिक्त आहेत. मागच्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढत असल्याने शासकीय व खाजगी रुग्णालयात रुग्ण उपचार घेत आहेत. सद्य:स्थितीला परभणी येथील आय.टी.आय. हॉस्पिटलमध्ये ८५, सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात २०, गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात २०, तसेच तालुकास्तरावरील ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांसाठी खाटा उपलब्ध आहेत.
१ लाख ३९ हजार नागरिकांच्या तपासण्या
परभणी : जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३९ हजार ६७० नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यातील ७८ हजार ८८६ नागरिकांच्या आरटीपीसीआरच्या साह्याने तपासण्या झाल्या आहेत. त्याचप्रमाणे ६० हजार ७८४ नागरिकांच्या तपासण्या झाल्या आहेत. एकूण तपासणी केलेल्या नागरिकांमध्ये १ लाख २९ हजार ९०५ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. ५९२ नागरिकांचे अहवाल अनिर्णायक अवस्थेत असून, १४० नागरिकांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेने नाकारले आहेत.