सावित्रीमाईंनी स्त्रियांना आत्मभान दिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:14 AM2021-01-04T04:14:40+5:302021-01-04T04:14:40+5:30
सेलू: वर्षानुवर्षे अज्ञानाच्या अंधकारात राहणाऱ्या स्त्रियांना ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांनी शिक्षणातून आत्मभान देऊन स्वओळख प्राप्त करून दिली. त्यांच्या शैक्षणिक ...
सेलू: वर्षानुवर्षे अज्ञानाच्या अंधकारात राहणाऱ्या स्त्रियांना ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांनी शिक्षणातून आत्मभान देऊन स्वओळख प्राप्त करून दिली. त्यांच्या शैक्षणिक क्रांतीमुळेच मी अधिकारी झाले. माझ्यासारख्या कित्येक स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रांत आज कर्तृत्व सिद्ध करीत आहेत, असे प्रतिपादन अप्पर कोषागार अधिकारी ज्योती बगाटे यांनी केले.
नूतन विद्यालयात ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रविवारी महिला शिक्षण दिन व कै. श्रीरामजी भांगडीया जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून परभणी येथील अप्पर कोषागार अधिकारी ज्योती बगाटे बाेलत होत्या.
अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर हे होते तर मंचावर प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक वानरे, उपमुख्याध्यापक रामकिशन मखमले, पर्यवेक्षक रघुनाथ सोन्नेकर , नारायण सोळंके , चित्रकला विभाग प्रमुख स्पर्धेचे संयोजक किशोर कटारे यांची उपस्थिती होती. बगाटे म्हणाल्या , सावित्रीमाईंनी स्त्रियांना शिक्षणाचे बळ दिले. त्यांचाच वारसा घेऊन आजच्या आधुनिक सावित्रीने आत्मनिर्भर होणे ही काळाची गरज आहे.
कार्यक्रमात कै. श्रीरामजी भांगडीया जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी चार गटांत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन चित्रकला शिक्षक फुलसिंग गावित यांनी केले. पहिल्या गटात आर्या कुलकर्णी , शर्वरी मोरे , प्रज्वल ठाकर , दुसऱ्या गटात समर्थ रोडगे , समर्थ दळवे, अनुष्का शेडुते , तिसऱ्या गटात संस्कृती बुरेवार , विनायक जोशी , दुर्गा देवधर तर चौथ्या गटात मयुरी सरकटे , मनीषा तिवारी , गौरी पावडे हे चिमुकले चित्रकार अनुक्रमे प्रथम , द्वितीय , तृतीय पुरस्कारानचे मानकरी ठरले. श्रीनिवास देवकर या विद्यार्थ्याने क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले. महिला शिक्षण दिनानिमित्त प्रशालेतील महिला शिक्षका व विविध वक्तृत्व स्पर्धेतील यशाबद्दल अनुष्का हिवाळे या सावित्रीच्या लेकींचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक वानरे यांनी केले. स्वागतगीत सच्चिदानंद डाखोरे व गीतमंचच्या विद्यार्थ्यांनी गायले. चित्रकला स्पर्धा आयोजनामागील भूमिका चित्रकला विभागप्रमुख संयोजक किशोर कटारे यांनी सांगितली. सूत्रसंचालन सुरेश हिवाळे यांनी केले. तर उपमुख्याध्यापक रामकिशन मखमले यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. काशिनाथ पल्लेवाड , अतुल पाटील , अनंतकुमार विश्वंभर , विरेश कडगे, सुनिता सांगुळे यांनी परिश्रम घेतले.