७ मार्चपर्यंत शाळा बंदच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:23 AM2021-02-27T04:23:44+5:302021-02-27T04:23:44+5:30

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्ह्यातील ५ ते ९ वी आणि ११ वीचे वर्ग २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ...

Schools will remain closed till March 7 | ७ मार्चपर्यंत शाळा बंदच राहणार

७ मार्चपर्यंत शाळा बंदच राहणार

Next

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्ह्यातील ५ ते ९ वी आणि ११ वीचे वर्ग २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी २० फेब्रुवारी रोजी काढले होते. फक्त १० व १२ वीचे वर्ग सुरू होते. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या कायम असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ५ वी ते ९ वी आणि ११ वीचे वर्ग ७ मार्चपर्यंत बंद ठेवण्यास मुदतवाढ दिली आहे. इयत्ता १० वी व १२ वीचे वर्ग नियमितपणे सुरू राहतील. सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी नियमितपणे शाळेत पूर्णवेळ उपस्थित राहून ऑनलाईन तसेच अभ्यासगटाच्या माध्यमातून अध्यापनाचे कामकाज व आवश्यक ती कामे करावीत. शिक्षणप्रक्रिया बंद राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. इयत्ता १० वी व १२ वी वर्गातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी कोरोनाबाबत शासन परिपत्रकानुसार प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोरपणे पालन करावे. १ व ८ मार्च रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनासाठी दोन सत्रांत विभागणी करून विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून जंतनाशक गोळ्याचे वाटप आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या निगराणीखाली करावे, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Schools will remain closed till March 7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.