शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:30 AM2021-03-04T04:30:56+5:302021-03-04T04:30:56+5:30
शिक्षण प्रवाहापासून दुरावलेल्या मुलांना शाळेत प्रवेश देणेसाठी शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार गटशिक्षणाधिकारी गणराज यरमळ यांनी ३७ पथकाची नियुक्ती केली ...
शिक्षण प्रवाहापासून दुरावलेल्या मुलांना शाळेत प्रवेश देणेसाठी शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार गटशिक्षणाधिकारी गणराज यरमळ यांनी ३७ पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकात बीएलओ व ४ शिक्षक यांचा सामावेश आहे. शाळाबाह्य विद्यार्थांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहत आणण्यासाठी हे सर्वेक्षण १ मार्चपासून सुरू करण्यात आले आहे. शासनाकडून ६ ते १८ वयोगटातील शाळा बाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. या सर्वेक्षणात इतर ठिकाणाहून स्थलांतर होऊन आलेले, रस्त्यावर भीक मागणारी मुले, लोककलावंतांची मुले, काम करणारे बालमजूर, ऊसतोड कामगारच्या वस्त्या, गावाबाहेरची पालं, वीटभट्ट्या, दगडकाम करणारे मजूर, अल्पसंख्याक गटातील मुले यांची माहिती या शोधमोहिमेत घेतली जात आहे.
सेलू तालुक्यात शहरी व ग्रामीण भागात ६ ते १८ वयोगटातील एकही विद्यार्थी शाळाबाह्य असणार नाही याबाबत काळजी घेण्यात येत असून त्यानुसार पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
गणराज यरमळ, गट शिक्षणाधिकारी, प.सं. सेलू.