परभणी जिल्ह्यातून पोलीस बंदोबस्तात सोडल्या सातशे बसगाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 07:54 PM2018-07-25T19:54:07+5:302018-07-25T19:55:15+5:30
पंढरपूर येथून विठ्ठलाचे दर्शन आटोपून निघालेल्या वेगवेगळ्या विभागाच्या ७०० बस मंगळवारी रात्री परभणी जिल्ह्यातून पोलीस बंदोबस्तात सोडण्यात आल्याची माहिती विभागीय नियंत्रण जालिंदर सिरसाठ यांनी दिली.
परभणी- पंढरपूर येथून विठ्ठलाचे दर्शन आटोपून निघालेल्या वेगवेगळ्या विभागाच्या ७०० बस मंगळवारी रात्री परभणी जिल्ह्यातून पोलीस बंदोबस्तात सोडण्यात आल्याची माहिती विभागीय नियंत्रण जालिंदर सिरसाठ यांनी दिली.
आषाढी एकादशीनिमित्त परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर आदी जिल्ह्यातील भाविक पंढरपूर येथून विठ्ठलाचे दर्शन घेऊन एसटी महामंडळाच्या बसने परतीच्या मार्गाला लागले. बसद्वारे प्रवास करणाऱ्या भाविकांना परभणी जिल्ह्याच्या हद्दीमध्ये महाराष्ट्र बंद आंदोलनाचा फटका बसू नये, यासाठी पंढरपूर येथून आलेल्या मंगळवारी रात्री ८ वाजेपासून ते बुधवारी पहाटे ७ वाजेपर्यंत गंगाखेड येथून पूर्णा तालुक्यातील झिरोफाट्यापर्यंत पोलीस बंदोबस्तात ७०० बसगाड्या सोडण्यात आल्या. त्यामुळे भाविक विठ्ठलाचे दर्शन घेऊन सुखरूप घरी पोहचले.