दहापैकी सात जणांना बायकोचाही मोबाइल नंबर पाठ नाही..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:13 AM2021-07-09T04:13:12+5:302021-07-09T04:13:12+5:30
मागील काही वर्षांत प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाइल आला आहे. यामुळे किरकोळ कामांसह फोन नंबर तसेच पत्ता, मेल आयडी व अन्य ...
मागील काही वर्षांत प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाइल आला आहे. यामुळे किरकोळ कामांसह फोन नंबर तसेच पत्ता, मेल आयडी व अन्य माहिती लिहून ठेवण्याची किंवा लक्षात ठेवण्याचे प्रमाण कमी झाले आहे. या सर्व बाबी मोबाइलमध्ये साठविल्या जात आहेत. त्यामुळे साहजिकच त्या लक्षात राहत नाहीत. लहान मुले वगळता तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत अनेकांच्या स्मरणशक्तीवर परिणाम झाल्याचे दिसून येते. गुरुवारी याबाबत पाहणी केली असता त्यात अनेकांना मोबाइल नंबरचे विस्मरण झाल्याचे दिसून आले.
लहान मुलांना आकडेमोड करण्याची सवय शाळेमध्ये गेल्यानंतर शिकण्यास मिळते; परंतु, मागील एक वर्षापासून कोरोनामुळे ऑनलाइन शाळा आहेत. यामुळे त्यांचा पाठांतराकडे फारसा कल दिसून येत नाही. यामुळे त्यांच्या शॉर्टटर्म मेमरीवर परिणाम होऊ शकतो. प्रत्येक वयोगटातील नागरिकांनी मोबाइलचा वापर गरजेपुरता करावा.
- जगदीश नाईक, मानसोपचार तज्ज्ञ
‘लोकमत’@ गांधी पार्क
अ - पत्नीचा नंबर आठवला. तसेच काही मित्रांचेही नंबर पाठ असल्याचे दिसून आले.
ब - पत्नीचा नंबर लक्षात नाही. तसेच इतर नातेवाइकांचे नंबरही आठवले नाहीत.
क - आई, वडील, पत्नी व भाऊ यापैकी कोणाचेच नंबर आठवले नाहीत.
ड - मोबाइलमध्ये बघून सांगण्याचा प्रयत्न केला.
ई - ज्येष्ठ नागरिकाच्या खिशातील डायरी काढून पत्नीचा व घरातील इतर सदस्यांचा मोबाइल नंबर सांगितला.