परभणी जिल्ह्यातील सात प्रकल्प कोरडेठाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 11:48 PM2019-04-02T23:48:29+5:302019-04-02T23:48:58+5:30
जिल्ह्यातील सात प्रकल्पांमध्ये पाणीसाठा शिल्लक नसल्याने टंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ येलदरी, निम्न दूधना, करपरा, मासोळी हे सर्वच प्रकल्प कोरडे पडले आहेत़ त्यामुळे आगामी काळातील पाण्याचा प्रश्न जिल्हावासियांना सतावणार आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील सात प्रकल्पांमध्ये पाणीसाठा शिल्लक नसल्याने टंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ येलदरी, निम्न दूधना, करपरा, मासोळी हे सर्वच प्रकल्प कोरडे पडले आहेत़ त्यामुळे आगामी काळातील पाण्याचा प्रश्न जिल्हावासियांना सतावणार आहे़
अर्ध्या मराठवाड्याची तहान भागविणारा प्रकल्प अशी जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पाची ख्याती असली तरी आज मात्र या प्रकल्पात जीवंत पाणीसाठा शिल्लक नाही़ मृतसाठ्यामध्ये १०२ दलघमी पाणीसाठा शिल्लक असल्याची आकडेवारी प्रशासनाकडून दिली जात आहे़ परंतु, या मृतसाठ्यात गाळ किती याचा अंदाज नसल्याने १०२ दलघमी पैकी किती पाणी उपलब्ध होवू शकते़ हाही प्रश्नच आहे़ मागील वर्षीच्या उन्हाळ्यात परभणीसह ४ तालुक्यांना दिलासादायक ठरलेला निम्न दूधना प्रकल्प यावर्षी कोरडा पडला आहे़ या प्रकल्पातही जीवंत पाणीसाठा शिल्लक नाही़ विशेष म्हणजे मागील वर्षी एप्रिल महिन्यात या प्रकल्पात ४८ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता़
सद्यस्थितीला मृतसाठ्यामध्ये ९३़२०० दलघमी पाणी शिल्लक आहे़ हे पाणी सेलू शहरासह तालुक्यातील इतर गावांसाठीच वापरावे लागणार आहे़ परिणामी परभणी, पूर्णा या दोन तालुक्यांना पाण्यासाठी पर्याय शोधावा लागणार आहे़
जिंतूर तालुक्यात करपरा मध्यम प्रकल्पामध्ये ०़६९३ (३ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे तर गंगाखेडच्या मासोळी मध्यम प्रकल्पामध्ये उपयुक्त पाणीसाठा शिल्लक नाही़ त्यामुळे हा प्रकल्प कोरडाठाक पडला आहे़ याशिवाय जिल्ह्यात २२ लघु प्रकल्प आहेत़ परंतु, एकाही प्रकल्पात पाणीसाठा नसल्याने ग्रामीण भाग टंचाईच्या कचाट्यात सापडला आहे़ या प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजना सद्यस्थितीला ठप्प आहेत़ ग्रामीण, शहरी भागासाठी पाणी आणायचे कोठून? असा प्रश्न निर्माण झाला आहे़
४गोदावरी नदीवर परभणी जिल्ह्यात पाच बंधारे बांधले आहेत़ त्यापैकी पालम तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्यात सध्या २़४४ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे़ मात्र या पाणीसाठ्यावर परभणीकरांचा हक्क नाही़ त्यामुळे पाणी असूनही हा बंधारा जिल्ह्यासाठी कोरडाच म्हणावा लागेल़ तर मुदगल ढालेगाव, मुळी या बंधाऱ्यातही पाणीसाठा शिल्लक नसल्याने बंधारा परिसरातील अनेक गावांत टंचाई निर्माण झाली आहे़
४दुष्काळाबरोबरच प्रशासकीय उदासिनतेचा फटका या बंधाऱ्यांना बसला आहे़ गंगाखेड तालुक्यात मुळी येथील बंधाºयाला दोन वर्षांपासून दरवाजे बसविले नाहीत़ त्यामुळे बंधाºयात पाणीसाठाच झाला नाही़ त्याचा फटका या परिसरातील शेतकºयांना सहन करावा लागत आहे़