शेवडी शिवारात अज्ञात रोगाने महिनाभरात पंचवीस जनावरे दगावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 07:37 PM2018-10-02T19:37:36+5:302018-10-02T19:38:48+5:30
तालुक्यातील शेवडी परिसरात अज्ञात आजाराची लागण होऊन २५ पाळीव जनावरे दगावली
जिंतूर : तालुक्यातील शेवडी परिसरात अज्ञात आजाराची लागण होऊन २५ पाळीव जनावरे दगावली. ही जनावरे प्रामुख्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांची आहेत. यासोबतच आणखी दहा ते पंधरा जनावरांची प्रकृती चिंताजनक असल्याने शेतकऱ्यांत भितीचे वातावरण आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, शेवडी या गावात महिनाभरापासून दररोज जनावरे दगावत आहेत. ही जनावरे शेषराव घनसावध, राधाकिशन काळे, संतोष सानप, अनीबा सानप, दिनकर घुगे, बाबाराव सानप, सुधाकर सानप आदी शेतकऱ्यांच्या मालकीची आहेत. जनावरांना अज्ञात रोगाची लागण झाल्याने मृत झाले आहेत, याबाबत आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, जिंतूर पंचायत समितीचे पशुवैद्यकिय विस्तार अधिकारी डॉ. प्रकाश अकोशे यांनी गावात भेट दिली आहे. त्यांनी मृत व लागण झालेल्या जनावरांची पाहणी केली असून याच्या अहवालानंतरच खरे कारण पुढे येईल.