सोनपेठ येथे महावितरणाच्या कार्यालयावर शिवसेनेचे बोंबा मारो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 03:40 PM2018-07-02T15:40:58+5:302018-07-02T16:01:03+5:30
शहरात व तालुक्यात वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. याच्या निषेधार्त आज दुपारी महावितरणाच्या कार्यालयावर शिवसेनेच्यावतीने ढोल बजाव बोंबा मारो आंदोलन करण्यात आले.
सोनपेठ (परभणी ): शहरात व तालुक्यात वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. याच्या निषेधार्त आज दुपारी महावितरणाच्या कार्यालयावर शिवसेनेच्यावतीने ढोल बजाव बोंबा मारो आंदोलन करण्यात आले.
सोनपेठ शहराला वीज पुरवठा सुरळीत होत नाही. विज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. विजेचा सतत लपंडाव सुरू असतो. यामुळे तालुक्यातील नागरिक त्रस्त आहेत. याचा निषेध करत शिवसेनेच्यावतीने आज दुपारी महावितरण कार्यालयावर ढोल बजाव , बोंबा मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी वीज पुरवठा सुरळीत करावा, विजेचे निष्कृष्ट खांब बदलावे यासोबत अन्य मागण्या करण्यात आल्या. उपअभिय॔ता डिग्रसकर यांनी आंदोलकांची भेट घेवुन निवेदन स्विकारले. तसेच त्यांनी तालुक्यातील विजेच्या अडचणी १५ दिवसात दूर करण्यात येतील असे लेखी आश्वासन दिले.
आंदोलन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मधुकर निरपणे यांच्या नेञत्वाखाली करण्यात आले. तालुकाप्रमुख रंगनाथ रोडे, अशोक यादव, जनार्धन झिरपे, रामेश्वर सोलापुरकर, भगवान पायघन, अरविंद बदाले, कुमार चव्हाण, दिगांबर चौथरी, देवा मस्के आदींचा आंदोलनात सहभाग होता.