शिवजयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:11 AM2021-02-22T04:11:52+5:302021-02-22T04:11:52+5:30
क्रीडा संकुल उभारणी थंड बस्त्यात सेलू: तालुका क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी १ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यास एका बैठकीत मंजुरी ...
क्रीडा संकुल उभारणी थंड बस्त्यात
सेलू: तालुका क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी १ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यास एका बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे शहरात अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला होता; मात्र त्यानंतर या क्रीडा संकुल उभारणीचे काम थंड बस्त्यात पडल्याचे दिसून येत आहे.
गोदेतून अवैध वाळू उपसा सुरूच
गंगाखेड: गंगाखेड तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रात असलेल्या वाळूचा चोरून विनापरवाना उपसा करण्यासाठी वाळू माफियामध्ये मोठी स्पर्धा लागल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. महातपुरी, आनंदवाडी, मैराळ सावंगी, गोंडगाव, गंगाखेड शहर, पिंपरी, मसला, नागठाणा आदी ठिकाणी हे प्रकार राजरोसपणे होत आहेत.
क्रॉसिंग पॉईंट बनले अपघात प्रवण क्षेत्र
मानवत: राष्ट्रीय महामार्गावरील पाथरी-मानवत रस्त्यावरील पोखरणी फाटा, रत्नापूर येथे क्रॉसिंग पॉईंट बनविण्यात आला आहे. या ठिकाणी दुभाजक ही बसविण्यात आले असल्याने रस्ता ओलांडताना दोन्ही बाजूने येणारी वाहने दिसत नसल्याने या ठिकाणी अपघात होण्याचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे क्रॉसिंग पॉईंट अपघात क्षेत्र बनत आहे.
बोरी- कौसडी रस्त्याची दुरवस्था
बोरी- सेलू आणि जिंतूर या दोन तालुक्याला जोडणाऱ्या बोरी ते कौसडी या रस्त्याचे डांबरीकरण होऊनही एका वर्षातच हा रस्ता जागोजागी उखडला आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली असून वाहनधारकांना रहदारीसाठी गैरसोयीचे ठरत आहे.
अवैध दारूची विक्री वाढली
जिंतूर: तालुक्यातील बोरी व परिसरात मागील अनेक दिवसांपासून अवैध दारूची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने अवैध धंदेवाल्यांना मोकळे रान सुटले आहे. याकडे पोलीस अधीक्षकांनी लक्ष द्यावे,अशी मागणी बोरी, वस्स, आसेगाव, दुधगाव गावातील ग्रामस्थांतून होत आहे.