हिस्सी येथे शिवजयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:26 AM2021-02-23T04:26:18+5:302021-02-23T04:26:18+5:30

हिस्सी: सेलू तालुक्यातील गुगुळी धामणगाव येथील उपकेंद्रावरुन होणारा विद्युत पुरवठा करणाऱ्या खांबावर वारंवार शॉर्टसर्किट होत असल्यामुळे ग्रामस्थांच्या जीवितास धोका ...

Shiva Jayanti celebrations at Hissi | हिस्सी येथे शिवजयंती साजरी

हिस्सी येथे शिवजयंती साजरी

Next

हिस्सी: सेलू तालुक्यातील गुगुळी धामणगाव येथील उपकेंद्रावरुन होणारा विद्युत पुरवठा करणाऱ्या खांबावर वारंवार शॉर्टसर्किट होत असल्यामुळे ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर अनेकांदा पिके जळाल्याची घटनाही घडली आहे. शेतीमध्ये कामे करताना हे खांब अंगावर पडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे याबाबत ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही महावितरणचे दुर्लक्ष झाले आहे.

अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान

हिस्सी : सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव, हिस्सी परिसरात १८ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे रबी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे नुकसान होवून दोन दिवसांचा कालावधी उलटला आहे. मात्र अद्यापपर्यंत महसूल प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्यात येत नाहीत. त्यामुळे बळीराजा संतप्त झाला आहे. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे.

खांबेगाव येथे क्रिकेट स्पर्धा

ताडकळस : पूर्णा तालुक्यातील खांबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ४० संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत आर.आर.सी. पूर्णा या संघाने प्रथम क्रामंक पटकावला तर ताडकळस येथील लयभारी क्रिकेट संघाने द्वितीय क्रमांक पटकावला तर लिमला येथील संघाने तृतीय क्रमांक पटकावला.

वालूर येथील आठवडी बाजार बंद

वालूर: सेलू तालुक्यातील वालूर येथे बुधवारी भरणारा आठवडी बाजार वाढत्या कोरोनामुळे स्थानिक प्रशासनाने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या अहवानानुसार बुधवारी भरणारा आठवडी बाजार बंद राहणार आहे.

वसमत रस्त्यावरील निवाऱ्यांची दुरवस्था

परभणी : शहरातील वसमत रस्त्यावरील प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. या निवाऱ्यांच्या ठिकाणी थांबण्यासाठी पुरेशी जागा शिल्लक नसल्याने प्रवाशांना रस्त्यावर थांबूनच बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्याचप्रमाणे सावली विश्रामगृह परिसरातील प्रवासी निवाऱ्याचीही दुरवस्था झाली आहे. एसटी. महामंडळाने याकडे लक्ष देऊन प्रवासी निवारे प्रवाशांना सोयीचे ठरतील, या पद्धतीने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

३६ जणांनी केले रक्तदान

मानवत : तालुक्यातील लोहरा येथील शिवतेज मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ३६ जणांनी रक्तदान केले. यावेळी अवधूत जाधव, नवनाथ पुरी, गणेश जाधव, गोपाळ जाधव, नितीन जाधव, केशव जाधव, विलास रोडगे, सर्जेराव खटींग, कपील जाधव, किशोर जाधव, ज्ञानेश्वर जाधव, गोविंद शिंदे, भागवत जाधव, बालाजी जावळे आदींनी प्रयत्न केले.

Web Title: Shiva Jayanti celebrations at Hissi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.