नियम व निर्देश पाळून शिवजयंती साजरी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:29 AM2021-02-18T04:29:23+5:302021-02-18T04:29:23+5:30
सद्यस्थितीत बदलत्या वातावरणात कोरोना महामारीच्या विषाणूंची सक्रियता वाढल्याने हा रोग रोखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी शिव जन्मोत्सव साजरा करतांना ...
सद्यस्थितीत बदलत्या वातावरणात कोरोना महामारीच्या विषाणूंची सक्रियता वाढल्याने हा रोग रोखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी शिव जन्मोत्सव साजरा करतांना शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे. मिरवणूक न काढता केवळ १०० लोकांच्या उपस्थितीत अभिवादनाचा कार्यक्रम घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी केले. या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी गोविंद खोडवे, तहसीलदार स्वरूप कंकाळ, पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, सपोनि राजेश राठोड, बालाजी गायकवाड, नगरसेवक सत्यपाल साळवे, तुकाराम तांदळे, शेख मुस्तफा, प्रमोद मस्के, रणधीर भालेराव, सखूबाई लटपटे, डी. डी. राजूरकर, संजय सुपेकर, जावेद इनामदार, आशाताई रेघाटे, लक्ष्मीबाई आडे आदींसह शांतता समितीचे सदस्य, पोलीस पाटील, राजकीय पक्षाचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. दरम्यान,या बैठकीत सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचा एकही पदाधिकारी उपस्थित नसल्याने शिवजयंती महोत्सवाच्या पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती मात्र प्रकर्षाने जाणवत होती.