शिवचरित्राच्या सामुहिक वाचनाने शिवजन्मोत्सवाची सुरवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:30 AM2021-02-18T04:30:41+5:302021-02-18T04:30:41+5:30
येथील जय भवानी मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा होणारा शिवजन्मोत्सव हा तालुक्यात शिवप्रेमींसाठी पर्वनीच ...
येथील जय भवानी मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा होणारा शिवजन्मोत्सव हा तालुक्यात शिवप्रेमींसाठी पर्वनीच असतो. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमांना फाटा देत शासनाने घालुन दिलेल्या नियमांच्या आधिन राहून छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृहात सामुहिक शिवचरित्राचे वाचन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक माणिक निलंगे हे होते. तर उदघाटक म्हणुन पोलिस निरीक्षक संदिपान शेळके यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर परमेश्वर कदम, प्रभाकर शिरसाट, प्रकाश राठोड,शिवाजी कदम,समिय्योद्दीन काझी, आकाश चव्हाण , प्रा.डाॅ.संतोष रणखांब, गणेश निरस, प्रा.डाॅ.मुकुंदराज पाटील, पुष्पाताई इंगोले, प्रदिप गायकवाड,ज्योत्सना आरगडे, नागनाथ जाधव,सुकेश यादव, किरण स्वामी, राधेश्याम वर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात गणेश पाटील, राजकुमार धबडे यांनी या सामुहिक वाचनाला सुरवात केली. या सामुहिक शिवचरित्र वाचनासाठी २०० शिवप्रेमी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी जय भवानी मित्र मंडळाचे बळीराम काटे, असिफ शेख, तुकाराम पांचाळ, रोहित हंचाटे, बालाजी मोटे, अक्षय इंगोले, वैभव भालेकर, शुभम भोसले, महादु हाके, गणेश भोसले, अक्षय शिंदे, ज्ञानेश्वर कलिंदर, संदेश माने, वैष्णवी वानखेडे, शितल पौळ, चंद्रा काटे, प्रेरणा काळभार आदींनी प्रयत्न केले.