शिवचरित्राच्या सामूहिक वाचनाने शिवजन्मोत्सवाची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:11 AM2021-02-19T04:11:07+5:302021-02-19T04:11:07+5:30

येथील जय भवानी मित्र मंडळाच्यावतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा होणारा शिवजन्मोत्सव हा तालुक्यात शिवप्रेमींसाठी पर्वणीच असतो; ...

Shivjanmotsava begins with a collective reading of Shivacharitra | शिवचरित्राच्या सामूहिक वाचनाने शिवजन्मोत्सवाची सुरुवात

शिवचरित्राच्या सामूहिक वाचनाने शिवजन्मोत्सवाची सुरुवात

Next

येथील जय भवानी मित्र मंडळाच्यावतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा होणारा शिवजन्मोत्सव हा तालुक्यात शिवप्रेमींसाठी पर्वणीच असतो; मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमांना फाटा देत शासनाने घालून दिलेल्या नियमांच्या अधिन राहून छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृहात सामूहिक शिवचरित्राचे वाचन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक माणिक निलंगे होते. तर उद्‌घाटक म्हणून पोलीस निरीक्षक संदिपान शेळके यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर परमेश्वर कदम, प्रभाकर शिरसाट, प्रकाश राठोड, शिवाजी कदम, समिय्योद्दीन काझी, आकाश चव्हाण, प्रा.डाॅ.संतोष रणखांब, गणेश निरस, प्रा.डाॅ.मुकुंदराज पाटील, पुष्पाताई इंगोले, प्रदीप गायकवाड, ज्योत्सना आरगडे, नागनाथ जाधव, सुकेश यादव, किरण स्वामी, राधेश्याम वर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात गणेश पाटील, राजकुमार धबडे यांनी या सामूहिक वाचनाला सुरुवात केली. या सामूहिक शिवचरित्र वाचनासाठी २०० शिवप्रेमी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी जय भवानी मित्र मंडळाचे बळीराम काटे, असिफ शेख, तुकाराम पांचाळ, रोहित हंचाटे, बालाजी मोटे, अक्षय इंगोले, वैभव भालेकर, शुभम भोसले, महादु हाके, गणेश भोसले, अक्षय शिंदे, ज्ञानेश्वर कलिंदर, संदेश माने, वैष्णवी वानखेडे, शीतल पौळ, चंद्रा काटे, प्रेरणा काळभार आदींनी प्रयत्न केले.

Web Title: Shivjanmotsava begins with a collective reading of Shivacharitra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.