परभणीत शिवसेनेने महावितरण कार्यालयाला ठोकले टाळे, लेखी आश्वासनानंतरच घेतले आंदोलन मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2017 05:11 PM2017-12-07T17:11:37+5:302017-12-07T17:18:58+5:30

शेतक-यांना कृषीपंपाच्या वीज जोडण्या देण्यात याव्यात, यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने सकाळी महावितरणच्या मुख्य कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन करण्यात आले. तब्बल चार तास चालेल्या या आंदोलनाने  विभागाच्या अधिका-यांची चांगलीच गोची झाली.

The Shivsena took away the office of the Mahavitaran office, after the written assurance | परभणीत शिवसेनेने महावितरण कार्यालयाला ठोकले टाळे, लेखी आश्वासनानंतरच घेतले आंदोलन मागे

परभणीत शिवसेनेने महावितरण कार्यालयाला ठोकले टाळे, लेखी आश्वासनानंतरच घेतले आंदोलन मागे

googlenewsNext
ठळक मुद्देशिवसेनेचे खा.बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी ११ वाजता महावितरणसमोर आंदोलन सुरु करण्यात आले. महावितरणसमोर आंदोलन सुरु असल्याने कल्याण-निर्मल या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक प्रारंभ तासभर ठप्प झाली होती. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापर्यंत चर्चा झाल्यानंतर महावितरणचे प्रकल्प संचालक दिनेशचंद्र साबू यांच्याशी चर्चा केल्यानंतर तोडगा निघाला. मागण्या मान्य केल्याचे अधीक्षक अभियंता कांबळे यांनी लेखी स्वरुपात खा.जाधव यांना दिले. त्यानंतर  खा. जाधव यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले.

परभणी :  शेतक-यांना कृषीपंपाच्या वीज जोडण्या देण्यात याव्यात, यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने सकाळी  महावितरणच्या मुख्य कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन करण्यात आले. तब्बल चार तास चालेल्या या आंदोलनाने  विभागाच्या अधिका-यांची चांगलीच गोची झाली. शेवटी मागण्या मान्य झाल्यासंदर्भात लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आले. 

शिवसेनेचे खा.बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी ११ वाजता महावितरणसमोर आंदोलन सुरु करण्यात आले. अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयामधील सर्व अधिकारी, कर्मचा-यांना बाहेर काढून खा.जाधव यांनी स्वत:च या कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारास कुलूप ठोकले. त्यानंतर महावितरणच्या अधिका-यांची धादंल उडाली. अधीक्षक अभियंता यशवंत कांबळे यांनी खा. जाधव यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, खा. जाधव यांनी जोपर्यंत मागण्या मान्य झाल्याचे लेखी आश्वासन मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला. 

महामार्ग झाला ठप्प 
महावितरणसमोर आंदोलन सुरु असल्याने कल्याण-निर्मल या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक प्रारंभ तासभर ठप्प झाली होती. त्यामुळे दोन्ही बाजुंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. पोनि. अशोक घोरबांड यांनी खा.जाधव यांच्याशी चर्चा करुन एका बाजुने वाहतूक सुरु करावी, अशी विनंती केली. त्यानंतर जवळपास अर्धा तास वाहतूक सुरु झाली. परंतु, महावितरणकडून ठोस आश्वासन मिळत नसल्याने शिवसैनिक संतापले. त्यानंतर पुन्हा रस्तारोको करण्यात आला. तसेच या रस्त्यावर तीन वेळा टायर जाळण्यात आले. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक काहीवेळ इतरत्र वळविण्याचा प्रयत्न झाला. परंतु, अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न सुटला नाही. 

व्यवस्थापकीय संचालकाचा पुतळ्याचे केले दहन 
या दरम्यान अधीक्षक अभियंता कांबळे यांनी वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा केली. वरिष्ठ अधिका-यांनी खा.जाधव यांच्याशी संवाद साधून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. परंतु, ठोस आश्वासन मिळत नसल्याने त्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरीया यांच्याकडूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने शिवसैनिकांनी त्यांना प्रतिकात्मक पुतळा जाळला. परिस्थिती चिघळत असल्याने पोलिसांनी शिवसैनिकांना शांत केले. 

ऊर्जामंत्र्याच्या चर्चेनंतर निघाला तोडगा 
या दरम्यान, खा.जाधव यांनी महावितरणचे आॅपरेशन विभागाचे संचालक देशपांडे, मुख्य अभियंता अविनाश पाटोळे यांच्याशी चर्चा केली. तरीही तोडगा निघाला नाही. अखेर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापर्यंत चर्चा झाली. त्यानंतर महावितरणचे प्रकल्प संचालक दिनेशचंद्र साबू यांच्याशी चर्चा केल्यानंतर तोडगा निघाला. त्यामध्ये प्रलंबित असलेल्या ३ हजार कृषीपंपाच्या वीज जोडण्यापैकी १ हजार वीज जोडण्यांच्या कामांना दोन दिवसांत सुरुवात करण्यात येईल, डीपी जळाल्यानंतर शेतक-यांकडून ५ हजार ऐवजी २ हजार रुपये एवढी रक्कम घेतली जाईल, दोष असलेले विद्युत मीटर बदलून दिले जातील. तसेच त्रुटी आढळलेल्या वीज बिलात दुरुस्ती करुन दिल्या जाईल, मराठवाडा-विदर्भ पॅकेज अंतर्गत मंजूर झालेल्या कामांसाठीचा निधी टप्प्याटप्प्याने जिल्ह्याला वितरित केला जाईल. या मागण्या मान्य केल्याचे अधीक्षक अभियंता कांबळे यांनी लेखी स्वरुपात खा.जाधव यांना दिले. त्यानंतर  खा. जाधव यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. तब्बल चार तासानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख संजय कच्छवे, उपजिल्हाप्रमुख माणिक पोंढे, सदाशीव देशमुख, जि.प.सदस्य विष्णू मांडे, राम खराबे, प्रभाकर वाघीकर, सखुबाई लटपटे, अर्जून सामाले, मधुकर निरपणे, दशरथ भोसले, पंढरीनाथ घुले, रविंद्र धर्मे, विशाल कदम, संतोष एकलारे, संदीप भंडारी, बाळासाहेब निरस आदींची उपस्थिती होती. 

पोलीस अधीक्षकांच्या आगमनानंतर गोंधळ
तब्बल चार तास आंदोलन सुरु असल्याने महावितरणच्या अधिका-यांची गोची झाली असताना आंदोलनस्थळी प्रारंभी पोलीस उपाधीक्षक संजय परदेसी आले. त्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्व पानसरे दाखल झाले. त्यानंतर पोलीस अधीक्षक दिलीप झळके स्वत: ३ वाजेच्या सुमारास महावितरण कार्यालयात आले. त्यानंतर महावितरणच्या कार्यालयाचे कुलूप उघडण्याची सूचना केली. त्यामुळे कार्यालयाच्या बाजुला असलेले खा.जाधव यांनी कुलूप उघडण्यास मज्जाव करुन संकटात सापडलेल्या शेतकºयांसाठी हे आंदोलन आहे. त्यामुळे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत कुलूप उघडू दिले जाणार नाही, असे सांगून महावितरणच्या प्रवेशद्वाराकडे धाव घेतली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. शेवटी पोलीस अधीक्षक झळके हे ही शांत झाले. त्यानंतर काही वेळातच लेखी आश्वासन महावितरणच्या अधिका-यांनी खा. जाधव यांना दिले.

Web Title: The Shivsena took away the office of the Mahavitaran office, after the written assurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.