धक्कादायक ! क्वारंटाईन कालावधी पूर्ण करून घरी परतलेल्या व्यक्तीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 02:06 PM2020-05-26T14:06:45+5:302020-05-26T14:07:26+5:30
या व्यक्तीवर सार्वजनिक स्मशानभूमीत १० जणांच्या उपस्थितीत आणि पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले़
बोरी : जिंतूर तालुक्यातील नागापूर येथे क्वारंटाईन असलेल्या वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच बोरी येथेही क्वारंटाईन कालावधी पूर्ण करून घरी परतलेल्या व्यक्तीचा २५ मे रोजी मध्यरात्री मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
बोरी येथील एक कामगार १ मे रोजी मुंबई येथून परतल्यानंतर त्यास जिल्हा परिषदेच्या शाळेत कुटूंबासह क्वारंटाईन केले होते़ क्वारंटाईनची मुदत संपून हा व्यक्ती घरी परतला होता़ २५ मे रोजी मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला़ या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ घटनेची माहिती समजताच वैद्यकीय अधिकारी डॉ़ गजानन सोळंके यांनी २६ मे रोजी बोरी येथे येऊन मयत व्यक्तीचा स्वॅब घेतला आहे. या व्यक्तीवर सार्वजनिक स्मशानभूमीत १० जणांच्या उपस्थितीत आणि पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले़ या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, डॉ़ गजानन सोळंके, तलाठी सुभाष होळ यांच्यासह गावचे सरपंच, उपसरपंच आणि कर्मचारी उपस्थित होते़ या घटनेमुळे मयत व्यक्तीच्या कुटूंबातील इतर ७ सदस्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे़