धक्कादायक ! शेतकरी कुटुंब बैलगाडीसह पाण्यात कोसळले; प्रसंगावधानाने जीव वाचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 12:22 PM2021-02-27T12:22:42+5:302021-02-27T12:26:40+5:30

पुलावरील पाण्यातून बैलगाडी घातली.मात्र, अंदाज न आल्याने बैलगाडीसह त्यातील सहाही जण खाली कोसळले.

Shocking! The farming family collapsed into the water with a bullock cart; The incident saved lives | धक्कादायक ! शेतकरी कुटुंब बैलगाडीसह पाण्यात कोसळले; प्रसंगावधानाने जीव वाचला

धक्कादायक ! शेतकरी कुटुंब बैलगाडीसह पाण्यात कोसळले; प्रसंगावधानाने जीव वाचला

googlenewsNext

- विठ्ठल भिसे 

पाथरी : पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने सहा जणांचे एक शेतकरी कुटुंब बैलगाडीसह नाल्यात कोसळल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी ( दि. २७ ) चाटे पिंपळगाव -बाभळगाव रस्त्यावर घडली. त्यांचा आरडाओरडा ऐकल्याने शेजारील शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखून तत्काळ धाव घेत बुडणाऱ्या कुटुंबाला वाचवल्याने अनर्थ टळला. 

पाथरी तालुक्यातील वाघाळा फाटा ते बाभळगाव फाटा या रस्त्यावर चाटे पिंपळगाव जवळ एक पूल आहे. पुलाचे काम झाले नसल्याने रेणापूर गावाकडून येणाऱ्या नाल्याचे पाणी चाटे पिंपळगावच्या पुलावर येते. त्यामुळे चाटेपिंपळगाव येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यास अडचणी येतात. सध्या जायकवाडी धरण्याच्या डाव्या कालव्याचे पाणी पुलावरून वाहत आहे. आज सकाळी चाटे पिंपळगाव येथील पारटकर कुटुंबातील सखाराम रंगनाथ पारटकर ( ६२ ), आसाराम सखाराम पारडकर ( ३० ), गिता आसाराम पारटकर ( २६ ), अपुर्वा आसाराम पारटकर ( ५ ), अनन्या आसाराम पारटकर ( ३ ) हे शेतात बैलगाडीमधून जात होते.

त्यांनी पुलावरील पाण्यातून बैलगाडी घातली.मात्र, अंदाज न आल्याने बैलगाडीसह त्यातील सहाही जण खाली कोसळले. त्यांचा आरडाओरडा ऐकून रस्त्याने जाणारे  शेतकरी हनुमान बोबडे व ज्ञानेश्वर काळे यांनी पुलाकडे धाव घेतली. त्यांनी लागलीच पाण्यात उडी घेऊन सर्वांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर  इतर ग्रामस्थांनी पाण्यात बुडालेली बैल गाडी बाहेर काढली. दरम्यान, याच पुलावरून गतवर्षी एक बैलगाडी पाण्यात कोसळली होती. त्यावेळी दोन बैल पाण्यात बुडून मृत्युमुखी पडले होते.

Web Title: Shocking! The farming family collapsed into the water with a bullock cart; The incident saved lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.