परभणी : धक्कादायक! धावत्या एसटी बसची दोन चाकं निखळली

By ज्ञानेश्वर भाले | Published: October 16, 2022 02:54 PM2022-10-16T14:54:09+5:302022-10-16T14:55:07+5:30

पूर्णा-नांदेड महामार्गाजवळील चुडावा येथील घटना

Shocking Two wheels of the running ST bus came off travellers are safe | परभणी : धक्कादायक! धावत्या एसटी बसची दोन चाकं निखळली

परभणी : धक्कादायक! धावत्या एसटी बसची दोन चाकं निखळली

googlenewsNext

परभणी : पूर्णा तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एसटी महामंडळाच्या धावत्या बसची एकामागून एक अशी दोन चाकं निखळून पडल्याची घटना रविवारी सकाळी ७ वाजता घडली. या बसमधून आठ ते दहा प्रवासी प्रवास करत होते. चालकाच्या समय सुचतकतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

वसमत आगार बस स्थानकातून वसमत ते धानोरा मोत्या (एम एच १४ बीटी१९५५) ही बस शनिवारी रात्री धानोरा मोत्या येथे मुक्कामी थांबली होती. रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास धानोरा मोत्यायेथून वसमतकडे निघाली होती. या बसमध्ये चालक वाहकासह आठ ते दहा जण प्रवास करत होते. राज्य मार्ग २५५ वरून धावत असताना अचानक चुडावा जवळ येताच बसचे मागील एक चाक निखळून पडले. मात्र तरीही बस धावत होती. दरम्यान ३३ केव्ही कार्यालयाजवळ येताच दुसरेही चाक निखळून पडल्याने एकदम गाडीचे संतूलन गेले. ही बाब चालकाच्या लक्षात येताच चालकांने तात्काळ बसवर ताबा मिळवत बस थांबविली. चालकाने पाहणी केल्यानंतर नट निखळल्याने हा प्रकार घडल्याचे लक्षात आले. सुदैवाने ही घटना महामार्गापासून काही अंतरावर घडल्याने मोठा अनर्थ टळला.

प्रवासी बचावले
वसमत - धानोरा मोत्या बसमधून दरारोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. दरम्यान रविवारी सुटी असल्न्याने आठ ते दहा प्रवाशीच प्रवास करत होते. मात्र असे असले तरी घटना धक्कादाखक असून महामंडळाचा निष्काळजीपणा प्रवाशांच्या जीववार बेतत असल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.

पर्यायी व्यवस्था केली नाही
बसची चाकं निखळल्यानंतर बसमधील प्रवाशांची व्यवस्था करणे गरजेचे असताना असे न करता प्रवाशांना इतर साधनांचा आधार घेत प्रवास करावा लागला.

Web Title: Shocking Two wheels of the running ST bus came off travellers are safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.