श्रेया वानरे प्रथम तर अनुष्का हिवाळे द्वितीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:09 AM2020-12-28T04:09:52+5:302020-12-28T04:09:52+5:30

परभणी : बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेच्या म. शं. शिवणकर विभागीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये बाल विद्याविहार शाळेतील श्रेया नरेंद्र वानरे ...

Shreya Wanare first and Anushka Hiwale second | श्रेया वानरे प्रथम तर अनुष्का हिवाळे द्वितीय

श्रेया वानरे प्रथम तर अनुष्का हिवाळे द्वितीय

googlenewsNext

परभणी : बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेच्या म. शं. शिवणकर विभागीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये बाल विद्याविहार शाळेतील श्रेया नरेंद्र वानरे या विद्यार्थिनीने प्रथम तर सेलू येथील नूतन विद्यालयाच्या अनुष्का सुरेश हिवाळे या विद्यार्थिनीने द्वितीय पारितोषिक पटकावले आहे. येथील बाल विद्यामंदिर शाळेत नुकतीच ही स्पर्धा पार पडली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक ए. यू. कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापिका शामा मुधळवाडकर, पर्यवेक्षक अरुण बोराडे, प्रदीप रुघे, रामदास तुम्मेवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. सहावीतील विद्यार्थी अजय जितेंद्र डाके याने म. शं. शिवणकर यांचे स्केच रेखाटून गुरुंजीप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी अजय डाके याचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेचे हे ४५ वर्ष असून, यावर्षी १८ शाळांनी सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेत बाल विद्याविहारची विद्यार्थिनी श्रेया नरेंद्र वानरे हिने प्रथम, सेलू येथील नूतन विद्यालयाची विद्यार्थिनी अनुष्का सुरेश हिवाळे हिने द्वितीय तर गांधी विद्यालयातील राजनंदिनी अनंतराव कदम या विद्यार्थिनीने तृतीय पारितोषिक पटकावले. गांधी विद्यालय एकतानगर शाखेचा पीयूष अरविंद सगर, गंगाखेड येथील विद्यानिकेतन हायस्कूलचा विद्यार्थी पार्थ रामदास भेंडेकर यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. विजेत्या विद्यार्थ्यांना २ हजार ५००, २ हजार, आणि १ हजार ५०० असे अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक वितरित करण्यात आले. तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना रोख ७०० रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. महेश कुलकर्णी, नवनाथ जाधव, संजय धर्माधिकारी यांनी काम पाहिले. सुभाष ढगे यांनी सूत्रसंचालन केले. गजानन जुंबडे यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वितेसाठी बाल विद्यामंदिर शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

फोटो ओळ : परभणी येथील बाल विद्यामंदिर शाळेत आयोजित कै म.शं. शिवणकर विभागीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांसमवेत मुख्याध्यापक अरुण कुलकर्णी, शामा मुधळवाडकर, अरुण बोराडे, प्रदीप रुघे, रामदास तुम्मेवाड, महेश कुलकर्णी, नवनाथ जाधव, संजय धर्माधिकारी आदी.

Web Title: Shreya Wanare first and Anushka Hiwale second

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.