मराठा आरक्षणासाठी आमदारांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:13 AM2021-07-04T04:13:30+5:302021-07-04T04:13:30+5:30
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी आ. डॉ. राहुल पाटील यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या संदर्भातील प्रश्न त्यांच्यापुढे मांडले. मराठा समाजाचे ...
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी आ. डॉ. राहुल पाटील यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या संदर्भातील प्रश्न त्यांच्यापुढे मांडले. मराठा समाजाचे ओबीसीकरण व ओबीसी आरक्षण स्वरक्षण करावे, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वीच्या मराठा समाजातील नोकरीपात्र उमेदवारांच्या रखडलेल्या नियुक्त्या तत्काळ द्याव्यात, मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, सर्व समाज घटकांची जातनिहाय जनगणना करावी, आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या. मराठा आरक्षणासंदर्भात विधिमंडळ अधिवेशनात भूमिका मांडावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बालाजी मोहिते, महानगराध्यक्ष गजानन जोगदंड, दिनकरराव गरुड, अमोल अवकाळे, साहेब शिंदे, तुकाराम सावंत, गंगाधर मोहिते, कृष्णा शिंदे, सागर लांडगे, स्वप्निल गरुड, रघुनाथ भोसले आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
राहुल पाटील यांचे आश्वासन
मराठा समाजाचे ओबीसीकरण, ओबीसी आरक्षणाचे संरक्षण, मराठा तरुणांच्या रखडलेल्या नियुक्त्या आदींबाबत ५ व ६ जुलै रोजी होणाऱ्या अधिवेशनात भूमिका मांडेन. तसेच मराठा ओबीसीकरणासाठी विशेष अधिवेशन भरवून राज्यपालांमार्फत मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा यासाठी केंद्र शासनाला शिफारस करावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे करेन, असे शपथपत्र आ. डॉ. राहुल पाटील यांनी आंदोलकांना दिले आहे.