‘सरल’ नंतर आता ‘शगून’;  सततच्या आॅनलाईनने शिक्षक झाले त्रस्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 12:15 PM2017-11-02T12:15:33+5:302017-11-02T12:16:57+5:30

शालेय विद्यार्थ्यांची माहिती सरल या वेब पोर्टलवर भरण्याच्या कामावरून रणकंदन सुरू असताना आता शालेय विद्यार्थ्यांची माहिती ‘शगून’ या वेब पोर्टलवर भरावी लागणार आहे.

'Simple' then 'Shagun' now; Sustainable online only teachers became stricken | ‘सरल’ नंतर आता ‘शगून’;  सततच्या आॅनलाईनने शिक्षक झाले त्रस्त 

‘सरल’ नंतर आता ‘शगून’;  सततच्या आॅनलाईनने शिक्षक झाले त्रस्त 

googlenewsNext
ठळक मुद्देसरलचा अनुभव पाहता शिक्षकांना अध्यापनासह संगणक आॅपरेटरचेही काम करावे लागत असल्याने तालुक्यातील शिक्षकांतून नाराजीचा सूर निघत आहे. केंद्र शासनाने  सर्व शिक्षा अभियानांतर्गत शिक्षकांसाठी शगून नावाचे वेब पोर्टल सुरू केले आहे.

- सत्यशील धबडगे 
मानवत (परभणी ) : शालेय विद्यार्थ्यांची माहिती सरल या वेब पोर्टलवर भरण्याच्या कामावरून रणकंदन सुरू असताना आता शालेय विद्यार्थ्यांची माहिती ‘शगून’ या वेब पोर्टलवर भरावी लागणार आहे. मात्र सरलचा अनुभव पाहता शिक्षकांना अध्यापनासह संगणक आॅपरेटरचेही काम करावे लागत असल्याने तालुक्यातील शिक्षकांतून नाराजीचा सूर निघत आहे.

देशभरातील शाळांमध्ये होणा-या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती एका क्लिकवर एकाच ठिकाणी मिळावी, या उद्देशाने केंद्र सरकारने शगून वेब पोर्टल सुरू केले आहे. इतर राज्यांची यशोगाथा, चांगल्या बाबींची माहिती दुस-या राज्यातील जनसामान्यांना मिळावी, यासाठी हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे. केंद्र शासनाने  सर्व शिक्षा अभियानांतर्गत शिक्षकांसाठी शगून नावाचे वेब पोर्टल सुरू केले आहे. ‘श’ म्हणजे शाळा ‘गुण’ गुणवत्ता असे एकत्रीकरण करून हे वेब पोर्टल अंमलात आणले. तालुक्यातील शाळांनी आपल्या तालुक्यातील चांगले उपक्रम या पोर्टलवर अपलोड करावयाचे       आहेत. 

२६ डिसेंबर ते २६ जानेवारी या काळात होणाºया चांगल्या कार्यक्रमांचे व्हिडि   ओ अपलोड करण्याचे आदेश महाराष्टÑ प्राथमिक शिक्षण परिषदेने ५ आॅक्टोबरला जाहीर केलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे. शाळांमधील विविध बैठका, शिक्षकांचे प्रशिक्षण, स्वरक्षणाचे कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, बोलक्या भिंती, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण, शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण, पालकांची बैठक, साहित्य वाटप, शाळा प्रवेशोत्सव, अध्ययन उपक्रम, विद्यार्थी मंत्रीमंडळ आदी उपक्रमांची माहिती शिक्षकांना या वेब पोर्टलवर अपलोड करावयाची आहे. 

एखादा शिक्षक, विद्यार्थी, शिपाई यांनी केलेल्या चांगल्या कामांची माहिती, यशोगाथा या संकेत स्थळावर भरावयाची आहे. एकीकडे सरलचा उडत असलेला गोंधळ त्यानंतर शगूनच्या अतिरिक्त कामामुळे शिक्षकातून नाराजीचा सूर उमटत आहे. नव्या पोर्टलची डोकेदुखी वाढल्याने पोर्टल कार्यान्वित होण्याअगोदरच या पोर्टलच्या विरोधात तक्रारी सुरू झाल्या आहेत. तालुक्यातील अनेक शाळेत इंटरनेट सुविधा नसल्याने या पोर्टलवर माहिती कशी अपलोड करावयाची? असा संतप्त सवाल शिक्षकांमधून उपस्थित केला जात आहे. 

रेंज गायब
एकीकडे डिजीटल उपक्रमाने शिक्षण विभागात क्रांती घडविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असताना ग्रामीण भागात इंटरनेटची रेंज मिळत नसल्याने सरलची माहिती भरताना शिक्षकांना अनेक अडचणींना तोंड  द्यावे लागले होते. आॅनलाईन बदल्या संदर्भात ऐन दिवाळीत शिक्षकांना नेटकॅफेवर दिवस घालवावे लागले होते. आता या शगून वेब पोर्टलवर विविध उपक्रमाची माहिती उपलोड करावयाची आहे. एकूणच शासनाच्या आॅनलाईन प्रक्रियेने शिक्षक त्रस्त झाले आहेत. दोन दिवसांपूर्वीच शासनाने मासिक पाळी संदर्भात शिक्षकांनी जनजागृती करण्याचे आदेशही काढले आहेत. शिक्षकांनी अध्यापन करावे की, उपक्रम राबवावेत, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

पोर्टलची माहिती देऊ 
शगून वेब पोर्टलबाबतीत आदेश प्राप्त झाले असून लवकरच या पोर्टल संबंधी माहिती शिक्षकांना देण्यात येणार आहे. 
- संजय ससाणे, गटशिक्षणाधिकारी, मानवत

Web Title: 'Simple' then 'Shagun' now; Sustainable online only teachers became stricken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.