सरणावर बसून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:13 AM2020-12-09T04:13:25+5:302020-12-09T04:13:25+5:30

पालम तालुक्यातील तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी शासनाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवून मनमानी कायदा करत बॉण्डवर नोटरी आधारे वाटणी फेरफार ...

Sitting on the sash | सरणावर बसून आंदोलन

सरणावर बसून आंदोलन

Next

पालम तालुक्यातील तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी शासनाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवून मनमानी कायदा करत बॉण्डवर नोटरी आधारे वाटणी फेरफार केला आहे. त्यामुळे चौकशी करून दोषी तलाठी व मंडल अधिकारी यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करत बोरगाव ता. पालम येथील अमोल अशोकराव कदम यांनी ७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता गंगाखेड उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर लाकडाचे प्रतिकात्मक सरण करून त्यावर बसून आंदोलन सुरू केले. तीन दिवसांच्या आत नियमानुसार कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचा लेखी आदेश उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी पालम तहसीलदार यांच्या नावे काढल्यानंतर अमोल कदम यांनी सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आंदोलनाची सांगता केली. दरम्यान,उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर सरणावर बसून केलेले अनोखे आंदोलन शहरवासियांसाठी दिवसभर चर्चेचा विषय ठरले होते.

Web Title: Sitting on the sash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.