शॉर्टसर्किटने जळाला सहा एकर ऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:43 AM2020-12-11T04:43:54+5:302020-12-11T04:43:54+5:30
आठ महिन्यांपासून बससेवा ठप्प पिंगळी : परभणी ते देऊळगाव ही बससेवा मार्च महिन्यापासून बंद असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. ...
आठ महिन्यांपासून बससेवा ठप्प
पिंगळी : परभणी ते देऊळगाव ही बससेवा मार्च महिन्यापासून बंद असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे एसटी. महामंडळाने बससेवा बंद केल्या होत्या. जून महिन्यापासून अनेक भागात ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र परभणी ते देऊळगाव बस अद्यापही सुरू झाली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. परभणी- देऊळगाव बस बंद असल्याने या मार्गावरील पिंगळी, ताडलिमला, पाथरा, वझूर, पांढरी आदी गावातील ग्रामस्थांना खासगी वाहनाने परभणी शहर गाठावे लागत आहे. बससेवा सुरू करण्याची मागणी होत आहे.
मिरखेलचे आरोग्य केंद्र बंद
पिंगळी : येथून जवळच असलेल्या मिरखेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बंद राहत असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. मागील आठ दिवसांपासून या आरोग्य केंद्रांत रुग्णांची तपासणी होत नसल्याने रुग्णांना खासगी दवाखाना गाठावा लागत आहे. येथील आरोग्य केंद्र सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.