अर्ध्या शहराचा वीजपुरवठा सहा तास खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:12 AM2021-06-30T04:12:39+5:302021-06-30T04:12:39+5:30
जिल्ह्यात मागील काही दिवसापासून विजेच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. ग्रामीण ...
जिल्ह्यात मागील काही दिवसापासून विजेच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. ग्रामीण भागासह शहरी भागातही या समस्या निर्माण होत आहेत. २९ जून रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास जिंतूर रस्त्यावरील १३२ के.व्ही. केंद्रांमध्ये विद्युत रोहित्रात बिघाड झाल्याने शहरातील अर्ध्या भागात वीजपुरवठा खंडित झाला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दर्गा रोड, स्टेडियम परिसर, नवामोंढा आदी भागातील वीज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास गुल झाली. मंगळवारी शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात जाणवत होता. त्यातच वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही झाली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, स्टेडियम परिसर या भागात शासकीय कार्यालय आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्याने शासकीय कार्यालयातील कामकाजाबरोबर व्यावसायिकांनाही अडचणींचा सामना करावा लागला. रात्री ८.३० च्या सुमारास शहरातील खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत झाला. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.