६४ वीज चोरांकडून सोळा लाखांची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:20 AM2021-09-21T04:20:28+5:302021-09-21T04:20:28+5:30
चोरून वीज वापरण्याचे प्रमाण जिल्ह्यात अधिक आहे. मागील काही दिवसांपासून आकडा टाकून विजेची चोरी करण्याबरोबरच मीटरमध्ये छेडछाड करीत वीज ...
चोरून वीज वापरण्याचे प्रमाण जिल्ह्यात अधिक आहे. मागील काही दिवसांपासून आकडा टाकून विजेची चोरी करण्याबरोबरच मीटरमध्ये छेडछाड करीत वीज चोरी केल्याची प्रकरणे उघडकीस आली होती. महावितरणने या वीज चोरांविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील १४ वीज चोरांवर कलम १२६ नुसार, तर १६७ जणांवर कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली आहे. परभणी विभाग क्रमांक १ मधील नऊ वीज चोरांविरुद्ध कलम १२६ नुसार, तर १०९ वीज चोरांवर कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली. विभाग क्रमांक दोन मधील पाच जणांवर कलम १२६ नुसार, तर ५८ जणांवर कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली. एकूण ६४ वीज चोरांकडून १६ लाख १६ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे.