झोपडपट्टीधारकांना मिळाला मालमत्ता नोंदणी उतारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:21 AM2021-07-14T04:21:11+5:302021-07-14T04:21:11+5:30
शहरातील अनेक भागांत गेल्या कित्येक वर्षांपासून झोपडपट्टीत राहणाऱ्या कष्टकरी, मजूर व कामगारांना घरकुल आवास योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी ...
शहरातील अनेक भागांत गेल्या कित्येक वर्षांपासून झोपडपट्टीत राहणाऱ्या कष्टकरी, मजूर व कामगारांना घरकुल आवास योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी या भागातील रहिवासी झोपडपट्टीतील घराच्या जागेसाठी संघर्ष करत होते. प्रभाग क्रमांक ८ मधील लहुजी नगर, रमाबाई नगर, आझाद नगर, रॉकेल कॉलनीतील झोपडपट्टीधारकांना त्यांच्या जागेचे मालमत्ता नोंदणी उतारे मिळवून देण्यासाठी नगरसेवक चंद्रकांत खंदारे यांनी प्रयत्न करून नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांच्यासह मुख्याधिकारी यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. अखेर ९ जुलै रोजी येथील १४७ नागरिकांना भोगवटादाराचा मालमत्ता नोंदणी उतारा मिळवून दिला. यामुळे येथील रहिवाशांना रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजना आदी योजनांतून हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानंतर येथील रहिवाशांनी प्रभाग क्रमांक ८ चे नगरसेवक चंद्रकांत खंदारे व नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांचा जाहीर सत्कार केला. याप्रसंगी नगरसेवक नागनाथ कासले यांच्यासह लक्ष्मण गायकवाड, शेख तौफिक, खाजाभाई, त्र्यंबक गायकवाड, जितेंद्र इचके, रमाकांत घोबाळे, अतीश खंदारे, राहुल लोंढे, शेख इस्माईल, रुस्तुम गायकवाड, सचिन जाधव, तातेराव गायकवाड, विनायक गायकवाड, राजाराम घोबाळे, सखुबाई उनवने, अज्ञानबाई रायभोळे आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.