स्मार्ट घरमालक की चोरट्यांचे नशीब फुटके? तीन घरे फोडली, चोरटे रिकाम्या हातांनी परतली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 06:19 PM2023-01-19T18:19:16+5:302023-01-19T18:19:41+5:30

पाथरी तालुक्यातील हदगाव (बु)येथील काही कुटुंब सेलू आणि पाथरी येथे राहतात.

Smart home owners or thieves lucky? Three houses were broken into, the thieves returned empty-handed | स्मार्ट घरमालक की चोरट्यांचे नशीब फुटके? तीन घरे फोडली, चोरटे रिकाम्या हातांनी परतली

स्मार्ट घरमालक की चोरट्यांचे नशीब फुटके? तीन घरे फोडली, चोरटे रिकाम्या हातांनी परतली

Next

पाथरी (परभणी) : तीन कुलूपबंद घरे फोडली पण घरात काहीच हाती न लागल्याने चोरट्यांना हात हलवत निघून जावे लागल्याचा प्रकार पाथरी तालुक्यातील हदगाव ( बु ) येथे बुधवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे. 

पाथरी तालुक्यातील हदगाव बु  येथील काही कुटुंब सेलू आणि पाथरी  येथे राहतात. बाहेरगावी राहत असल्याने त्यांच्या गावाकडील घराला कुलूप असते. जास्त काळ वास्तव्य नसल्याने घरात महागामोलाच्या वस्तू नव्हत्या. दरम्यान, बंद घरात आता चांगला माल हाती लागेल असे समजून चोरट्यांनी पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास कुलूप तोडून एका घरात प्रवेश केला. त्यात काहीच हाती न लागल्याने. बाजूची दोन घरे फोडली. मात्र, तिन्ही घरातून हाती काहीच हाती लागले नाही. यामुळे चोरटे रिकाम्या हाताने परतले. दरम्यान, याप्रकरणी नितीन नखाते ( रा. हदगाव बु हल्ली मु. पाथरी ) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पो हे कदम करत आहेत.
 

Web Title: Smart home owners or thieves lucky? Three houses were broken into, the thieves returned empty-handed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.