ताडबेरगाव परिसरात कापसावर गोगलगायीचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:13 AM2021-06-21T04:13:47+5:302021-06-21T04:13:47+5:30
परिसरात यंदा जूनच्या सुरुवातीला पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी घाई करून कपाशीची लागवड केली. मृग नक्षत्रात झालेला पावसाचा यास ...
परिसरात यंदा जूनच्या सुरुवातीला पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी घाई करून कपाशीची लागवड केली. मृग नक्षत्रात झालेला पावसाचा यास फायदा होऊन पिकांची उगवनही चांगली झाली. परंतू, आता उगवून आलेल्या पिकांवर परिसरातील अनेक भागात गोगलगायीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यांच्याकडून नुकतेच जमिनीतून वर आलेले अंकुर फस्त केले जात आहे. पिकांवर किडींचा झालेल्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. पिकांचे जास्त नुकसान करणारी कीड म्हणून गोगलगाय ओळखली जाते. ही कीड कपाशी, सोयाबीनचे बियाणे फस्त करून टरफल शिल्लक ठेवते तर रोपांवरील पानासहीत संपूर्ण रोप खाऊन टाकतात.
पाच एकरवर कपाशीची लागवड केली असून कपाशी उगवून वर येताच त्यावर गोगलगाय या किडीने हल्ला करून निम्मे पिक फस्त केले आहे. त्यामुळे दुबार लागवड करण्याची वेळ आली आहे. - रोहिदास जंगले, शेतकरी, ताडबोरगाव.