सापांचे संवर्धन काळाची गरज : खैरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:20 AM2021-08-15T04:20:24+5:302021-08-15T04:20:24+5:30
येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय ऑनलाइन वेबीनारमधील पहिल्या सत्रात ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. ...
येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय ऑनलाइन वेबीनारमधील पहिल्या सत्रात ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, प्रमुख मार्गदर्शक सर्पमित्र रणजित कारेगावकर, उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशेट्टी, उपप्रचार्य डॉ. विजया नांदापूरकर, डॉ. रोहिदास नितोंडे, प्राणीशास्त्र विभागाचे डॉ. एच. एस. जगताप, डॉ. सचिन येवले, डॉ. ओमप्रकाश चिलगर आदींची उपस्थिती होती.
'निसर्ग आणि समाजासाठी सापांचा पौराणिक ते वैज्ञानिक अभ्यास' या विषयावर हा परिसंवाद घेण्यात आला. डॉ.अनिल खैरे म्हणाले, सापाच्या तीन हजार प्रजाती आहेत. त्यापैकी २०० प्रकारचे साप हे विषारी आहेत. त्यातील फक्त ७ टक्के सापच मानवाला गंभीर स्वरूपाची इजा पोहचवू शकतात किंवा मृत्यू होऊ शकतो, असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव म्हणाले, सापांच्या बाबतीत समाजात अनेक गैरसमज आहेत. या संदर्भाने प्राणीशास्त्र विषयातील तज्ज्ञ संशोधकांनी पुढे येऊन जनजागृती केली पाहिजे. या संदर्भात जनजागृती झाल्यासच परिसंस्थेचे संतुलन टिकून राहील. कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, छत्तीसगढ, बंगाल, केरळ आदी राज्यांतील संशोधक विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. एच. एस. जगताप यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सचिन येवले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. जयंत बोबडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. ओमप्रकाश चिलगर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. साजिया देशमुख, डॉ. एम. बी. बर्वे, प्रा. सय्यद जफर, प्रा. ए. आर. कुऱ्हाडे, प्रा. ए. एम. भंडारी आदींनी परिश्रम घेतले.