अपूर्वा पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी बनविली सोलर ट्रायसिकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:42 AM2020-12-17T04:42:56+5:302020-12-17T04:42:56+5:30
सोलार ट्रायसिकल २५० किलो वजनाची असून, २०० किलो वाहक क्षमता आहे, तसेच ती पूर्णतः सोलार ऊर्जावर चालणारी आहे. या ...
सोलार ट्रायसिकल २५० किलो वजनाची असून, २०० किलो वाहक क्षमता आहे, तसेच ती पूर्णतः सोलार ऊर्जावर चालणारी आहे. या सोलार ट्रायसिकलकरिता ४०० वॅटचे २ सोलार पॅनल, १२ व्होल्ट ७० ॲम्पियरच्या बॅटरीज, १ मोटार, चार्जर कंट्रोलर इत्यादी साहित्यांच्या वापर करून ४ तास चार्जिंग झाल्यांनतर तासी ४५ कि.मी. वेगाने ८०-९० किलोमीटरपर्यंत सोलार ट्रायसिकल धावते, तसेच सूर्यप्रकाश असताना सोलार ट्रायसिकल चार्ज होत राहते, तसेच या सोलार ट्रायसिकलमध्ये इतर आवश्यक सुविधासुद्धा पुरविण्यात आल्या आहेत. जसे की, मोबाइल चार्जिंग इत्यादी. विशेष बाब म्हणजे सोलार ट्रायसिकलची निर्मिती पूर्णतः महाविद्यालयाच्या कार्यशाळेमध्येच करण्यात आलेली आहे. सदरील सोलार ट्रायसिकलची निर्मिती करण्यासाठी कुलदीप जाधव, वैभव मोहिते, संतोष बर्डे, रश्मी भद्रंगे, अन्सारी गुफरान, पवन राठोड, विशाल लाड, अनिल चौरे आदी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. या सोलार ट्रायसिकलची विशेषता बघून सेलू व परिसरामध्ये कुतुहल व्यक्त करण्यात येत आहे. याप्रसंगी श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय रोडगे, नारायण पाटील, राम सोनवणे, डॉ. विलास मोरे, मोहम्मद इलियास, शिवाजी आकात, श्रीपाद कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, प्राचार्य प्रा. अशोक बोडखे, उपप्राचार्य प्रा. गजानन जाधव, डॉ. मधुबाला बोराडे, डॉ. मीनाक्षी रत्नपारखी आदींची प्रमुख उपस्थिती होती.