समझोता कॉलनीतील विजेची समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:14 AM2020-12-29T04:14:49+5:302020-12-29T04:14:49+5:30

शिवसेनेचे उपशहरप्रमुख राहुल खटींग यांच्या माध्यमातून या दोन्ही वसाहतीतील नागरिकांनी सोमवारी आ.डॉ.राहुल पाटील यांची भेट घेतली. आ.पाटील यांच्याकडे ...

Solve the problem of electricity in the settlement colony | समझोता कॉलनीतील विजेची समस्या सोडवा

समझोता कॉलनीतील विजेची समस्या सोडवा

Next

शिवसेनेचे उपशहरप्रमुख राहुल खटींग यांच्या माध्यमातून या दोन्ही वसाहतीतील नागरिकांनी सोमवारी आ.डॉ.राहुल पाटील यांची भेट घेतली. आ.पाटील यांच्याकडे निवेदन देऊन या भागात निर्माण झालेल्या विजेच्या समस्यांची माहिती दिली. समझोता कॉलनी भागात विद्युत खांबांची समस्या गंभीर झाली आहे. सुमारे २५ घरांचा विद्युत भार एकाच खांबावर असल्याने हा खांब वाकला आहे. त्यामुळे डीपीवरील सिंगल फेज जळणे, वीज बंद होणे असे प्रकार सातत्याने होत आहेत. कॉलनी रात्रीच्या वेळी अंधार पसरत आहे. या समस्या ऐकल्यानंतर आ.डॉ.राहुल पाटील यांनी महावितरणच्या अभियंत्यांशी संपर्क करुन गजानननगर, समझोता काॅलनीतील नागरिकांच्या विजेच्या समस्या तत्काळ सोडविण्याच्या सूचना केल्या. याप्रसंगी राहुल खटींग, एस.एम. जोशी, पी,एस. गायकवाड, रामप्रसाद अवचार, प्रवीण जोशी, आर.डी. आहेर, डी.जी. शिंदे, नारायण बोंगाने, कैलास डाफणे, जयवंत गरुड, तुळशीराम गरुड, विश्वांभर काठवटे, श्रीनिवास यन्नावार, एम.आर. कदम, बी.डी. भोसले, बाळासाहेब ढोले, चिलवंत, आपटे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Solve the problem of electricity in the settlement colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.