परभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टरवर सोयाबीनचा झाला पेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 12:22 AM2018-07-14T00:22:37+5:302018-07-14T00:23:11+5:30

जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने खरीप हंगामासाठी ५ लाख २१ हजार ८७० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. त्यापैकी ३ लाख ७७ हजार ९२१ हेक्टर क्षेत्रावर ७ जुलैपर्यंत पेरणी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे यावर्षी कापसाचे क्षेत्र घटून सोयाबीनचा १ लाख ६४ हजार ९९५ हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला आहे.

Sow can be soybean in 1.5 lakh hectare in Parbhani district | परभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टरवर सोयाबीनचा झाला पेरा

परभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टरवर सोयाबीनचा झाला पेरा

Next
ठळक मुद्देकापसाचे क्षेत्र घटले: पावणे चार लाख हेक्टरवर पेरणी

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने खरीप हंगामासाठी ५ लाख २१ हजार ८७० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. त्यापैकी ३ लाख ७७ हजार ९२१ हेक्टर क्षेत्रावर ७ जुलैपर्यंत पेरणी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे यावर्षी कापसाचे क्षेत्र घटून सोयाबीनचा १ लाख ६४ हजार ९९५ हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला आहे.
जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामात मूग, उडीद, सोयाबीन व कापूस या प्रमुख पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी करतो. गत खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी जवळपास २ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड केली होती. मात्र पहिल्याच वेचणीनंतर गुलाबी बोंडअळीने हल्ला चढविल्यानंतर शेतकºयांनी पिकावर केलेला खर्चही उत्पादनातून निघालेला नाही. त्याच बरोबर बाजारपेठेतही कवडीमोल दराने कापूस विक्री करावा लागला. या उलट सोयाबीनला सरतेशेवटी बाजारपेठेत ४ हजार रुपयांपर्यंतचा भाव मिळाला. जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी ५ लाख २१ हजार २७० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. त्यामध्ये सोयाबीनसाठी ८८ हजार ६३०, कापसासाठी २ लाख ९ हजार ४३०, मुगासाठी ५३ हजार ३५०, तुरीसाठी ६१ हजार २३०, उडीदासाठी १४ हजार १४० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते.
गत खरीप हंगामातील कापसाचा कटू अनुभव पाहता यावर्षी सोयाबीनचा पेरा जिल्ह्यामध्ये वाढेल, अशी अपेक्षा होती. त्यानुसार ७ जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये १ लाख ६४ हजार ७९५ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला आहे. तर दुसरीकडे २ लाख ९ हजार ४३० हेक्टरपैकी केवळ १ लाख २७ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. त्यामुळे यावर्षीच्या खरीप हंगामात १८५ टक्के सोयाबीनची पेरणी झाली आहे.
---
दमदार पावसाची गरज
यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये जून महिन्यापासूनच जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण पाऊस होत आहे. या पावसावरच शेतकरी पेरता झाला आहे. पिकांची अवस्थाही बºयापैकी आहे; परंतु, सध्या जिल्ह्यामध्ये दमदार पावसाची आवश्यकता आहे. त्यामुळे येत्या आठ-दहा दिवसांमध्ये एखादा चांगला पाऊस झाला तर पिकांना जीवदान मिळणार आहे.

Web Title: Sow can be soybean in 1.5 lakh hectare in Parbhani district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.