परभणी जिल्ह्यात २०३ टक्के हरभºयाचा पेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 12:18 AM2018-01-14T00:18:25+5:302018-01-14T00:18:35+5:30

यावर्षीच्या रबी हंगामात शेतकºयांनी हरभºयाच्या पेरणीवर भर दिला असून, प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत २०३ टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात हरभºयाची पेरणी झाली आहे़ त्यामुळे जिल्ह्यात हरभºयाचे उत्पादन अनेक पटीने वाढणार आहे़

Sowing of 203% of Germ in Parbhani district | परभणी जिल्ह्यात २०३ टक्के हरभºयाचा पेरा

परभणी जिल्ह्यात २०३ टक्के हरभºयाचा पेरा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : यावर्षीच्या रबी हंगामात शेतकºयांनी हरभºयाच्या पेरणीवर भर दिला असून, प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत २०३ टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात हरभºयाची पेरणी झाली आहे़ त्यामुळे जिल्ह्यात हरभºयाचे उत्पादन अनेक पटीने वाढणार आहे़
जिल्ह्यातील जमीन सुपिक असल्याने दोन्ही हंगामामधून शेतकºयांना मोठ्या अपेक्षा असतात़ त्यामुळे दरवर्षी खरीप आणि रबी हंगामाची जय्यत तयारी केली जाते़ सध्या खरीप हंगामामध्ये नगदी पीक घेण्याकडे शेतकºयांचा कल दिसून येत आहे त्यामुळे सोयाबीन, कापूस या दोनच पिकांची पेरणी वाढली़ रबी हंगामामध्ये गहू हे महत्त्वाचे पीक आहे़ दरवर्षी शेतकरी गव्हाची मोठ्या प्रमाणात पेरणी करतात़ त्याच जोडीला ज्वारी देखील घेतली जाते़ अनेक वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे़
मात्र यावर्षी या परंपरेला छेद देत शेतकºयांनी गहू आणि ज्वारी या दोन्ही पिकांच्या तुलनेत हरभºयाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले आहे़ ५ वर्षांच्या पेरणीचा अंदाज लक्षात घेऊन कृषी विभागाने यावर्षीच्या रबी हंगामाचे नियोजन केले़ २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्र रबीच्या पेरणीसाठी प्रस्तावित केले होते़ त्यानुसार २ लाख ५१ हजार ८१६ हेक्टर क्षेत्रावर पेरणीही झाली़ ९०़८१ टक्के पेरणी शेतकºयांनी उरकली आहे़ त्यामुळे रबी क्षेत्राचा कृषी हंगामाचा अंदाज जवळपास खरा ठरला आहे़ मात्र गहू, ज्वारी आणि हरभरा या तीन पिकांच्या पेरणीबाबत वर्तविलेल्या अंदाजाच्या तुतलनेत कमी अधिक प्रमाणात पेरणी झाली आहे़ त्यामुळे यावर्षी शेतकºयांनी पारंपारिक पद्धतीला फाटा दिल्याचे दिसत आहे़
दरवर्षी गहू आणि ज्वारीचा पेरा मोठ्या प्रमाणात केला जात होता़ मात्र यावर्षी शेतकºयांनी हरभºयाला पसंती दिली आहे़ दरवर्षी प्रमाणे यावर्षी कृषी विभागाने ज्वारीच्या पिकासाठी १ लाख ५९ हजार ७८ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते़ प्रत्यक्षात १ लाख १९ हजार ६० हेक्टर म्हणजे ६४ टक्के पेरणी झाली आहे़
संशोधकांसमोरच आव्हान
यावर्षी रबी हंगामात शेतकºयांकडून ज्वारी पिकाला फाटा देत हरभºयाची पेरणी वाढली आहे़ यासाठी वेगवेगळी कारणे आहेत़ कमी झालेले पशूधन, ज्वारी काढणीसाठी लागणारा खर्च या कारणांचा समावेश आहे़
विशेष म्हणजे ज्वारीला भाव देखील चांगला मिळतो़ तरीही शेतकºयांनी ज्वारीच्या पेरणीकडे पाठ फिरवत हरभºयाची पेरणी केली आहे़
त्यामुळे रबी हंगामामध्ये तत्काळ पैसा देणाºया ज्वारीला पर्यायी पिकांचे संशोधन करून शेतकºयांसमोर नवा पर्याय देण्याचे आव्हान कृषी संशोधकांसमोर निर्माण झाले आहे़

Web Title: Sowing of 203% of Germ in Parbhani district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.