कोविड रुग्णालयाच्या आवारातील वायरिंगमध्ये स्पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:15 AM2021-04-26T04:15:27+5:302021-04-26T04:15:27+5:30

परभणी : येथील जिल्हा परिषदेच्या कोविड हॉस्पिटलच्या आवारात बसविलेल्या जनरेटरच्या वायरिंगला अचानक स्पार्किंग होऊन आग लागल्याचा प्रकार २५ एप्रिल ...

Sparking in the wiring of the Kovid hospital yard | कोविड रुग्णालयाच्या आवारातील वायरिंगमध्ये स्पार्किंग

कोविड रुग्णालयाच्या आवारातील वायरिंगमध्ये स्पार्किंग

Next

परभणी : येथील जिल्हा परिषदेच्या कोविड हॉस्पिटलच्या आवारात बसविलेल्या जनरेटरच्या वायरिंगला अचानक स्पार्किंग होऊन आग लागल्याचा प्रकार २५ एप्रिल रोजी सायंकाळी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला. याचवेळी येथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवित अग्निशमन यंत्राच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला.

येथील जिल्हा परिषदेच्या कोविड हॉस्पिटलच्या आवारात भिंतीला लागूनच एक जनरेटर ठेवलेला आहे. या जनरेटरपासून जवळच बोर्ड बसविला आहे. या बोर्डवरील वायरिंगला रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक स्पार्किंग होऊन आग लागली. आगीच्या ठिणग्या दिसताच येथील कर्मचाऱ्यांनी तातडीने अग्निशमन यंत्राच्या साहाय्याने ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे अनर्थ टळला. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आग नियंत्रणात आणण्याचे तांत्रिक प्रशिक्षण दिले होते. कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत आग नियंत्रणात आणली. त्यामुळे अनर्थ टळला. दरम्यान, आगीच्या घटनेनंतर प्रभारी अग्निशमन अधिकारी दीपक कानोडे यांनी रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली. ज्या खोलीतून मुख्य वीज प्रवाह गेला आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साहित्य पडलेले होते. हे साहित्य हटविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

जि. प.च्या कोविड रुग्णालय परिसरात ऑक्सिजन प्रकल्प उभारला जात आहे. यासाठी दिवसभर वेल्डिंगसह इतर कामे केली जात आहेत. त्यामुळे वीज भार वाढून स्पार्किंग झाली असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

फोटो : याच बोर्डात स्पार्किंग होऊन वायर जळाले. (उत्तम बोरसुरीकर) (२५पीपीएच३५)

जि.प.च्या कोविड रुग्णालयातील मुख्य वीज प्रवाह गेलेल्या खोलीतील वायरिंगचे काम करताना कर्मचारी. याच ठिकाणी पडून असलेले साहित्य. (उत्तम बोरसुरीकर)

Web Title: Sparking in the wiring of the Kovid hospital yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.