डिग्रस बंधाऱ्याच्या मावेजासाठी संयुक्त मोजणीला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:33 AM2020-12-16T04:33:12+5:302020-12-16T04:33:12+5:30

गोदावरी नदीवरील डिग्रस उच्च पातळीचा बंधारा उभारून दशक लोटले. आत्ता कुठे मावेजा देण्यासाठी संयुक्त मोजणीला गती आली आहे. ...

Speed of joint counting for digging of Degrass dam | डिग्रस बंधाऱ्याच्या मावेजासाठी संयुक्त मोजणीला गती

डिग्रस बंधाऱ्याच्या मावेजासाठी संयुक्त मोजणीला गती

Next

गोदावरी नदीवरील डिग्रस उच्च पातळीचा बंधारा उभारून दशक लोटले. आत्ता कुठे मावेजा देण्यासाठी संयुक्त मोजणीला गती आली आहे. आतापर्यंत तालूक्यातूील फरकंडा, डिग्रस, जवळा आणि पूर्णा तालूक्यातील महागाव, कळगाव, बानेगाव, धानोरा काळे येथील शेतकऱ्यांना मावेजाचे वाटप करण्यात आले. परंतू, गुळखंड, फळा, या गावातील जमिनीची संयुक्त मोजणी झाली. मात्र मावेजा वाटप करण्यात आलेला नाही. उर्वरीत १८ गावातील जमिनीची संयुक्त मोजणी करण्याचे बाकी आहे. त्यात पालम तालुक्यातील सोमेश्वर, आरखेड, घोडा, शिरपूर, सायळ, कापसी, रावराजुर, उमरथडी, सावंगी समावेश आहे. तर गंगाखेड तालुक्यातील पिंपरी देखील मोजनीपासून वंचित आहे. तसेच पूर्णा तालुक्यातील गोळेगाव, देऊळगाव, देवठाणा, वजुर, खरबडा या गावांची देखील मोजणी होणे बाकी आहे. शिवाय, परभणी तालुक्यातील धसाडी व अंगलगाव, ही दोन गावे देखील मोजणीविना आहेत. या गावांच्या मोजणीसाठी भूमी अभिलेख विभागाकडे एकमेव मशीन उपलब्ध आहे. त्यातच अपुरे मनुष्यबळ, या समस्येला तोंड देत अधिकारी मोजणी करीत आहेत. मंगळवारी पालम तालुक्यातील सिरपूर येथे मोजणी करण्यात आली. येथील गळाटी नदीकाठी काटेरी झुडपे, बाबळी, पुराच्या पाण्यात पाहून आली काटे आदी अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. खुद्द भूमिअभिलेख विभागाचे उपअधीक्षक व्ही. एन. अन्नमवार यांनी १४ डिसेंबर रोजी शिरपूर ला भेट देत पाहणी केली. यावेळी आर.एन. सवंडकर, दुरुस्ती लिपिक एस.के. नाईकनवरे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सहायक ए.एन. पोनंम, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक एस.एस. इंगोले, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक बी.टी. रांवळकर यांचा समावेश आहे.

Web Title: Speed of joint counting for digging of Degrass dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.