जीव धोक्यात घालून सोयाबीनची फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:19 AM2021-08-29T04:19:48+5:302021-08-29T04:19:48+5:30
पालम तालुक्यात यावर्षी खरीप हंगामात २८ हजार हेक्टरवर सोयाबीन पिकाची पेरणी करण्यात आली आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे पिकाची नासाडी झाली ...
पालम तालुक्यात यावर्षी खरीप हंगामात २८ हजार हेक्टरवर सोयाबीन पिकाची पेरणी करण्यात आली आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे पिकाची नासाडी झाली होती. यानंतर शेतकऱ्यांना महागडी औषध व खताचा डोस वापरून निसर्गाच्या कचाट्यात वाचलेले पीक संगोपन केले आहे. आतापर्यंत दोन फवारणी झाल्या आहेत. फुलांतून शेंगा लागण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे हा काळ अतिशय महत्त्वाचा आहे. सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव पडत आहे. त्यामुळे शेंगा पोखरल्या जात आहेत. या काळात चांगल्या दर्जाचे कीटकनाशक व बुरशीनाशक फवारणी करावी लागत आहे. मात्र पीक वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. यात फवारणी करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पिकाने पूर्ण जमीन झाकाळून गेली आहे. त्यामुळे पाठीवर १५ लिटर औषध घेऊन जाताना दमछाक होत आहे. त्यातच पिकात सर्पदंश भीती वाटत आहे. त्यामुळे हे काम करताना भीतीचे सावट निर्माण झाले आहे.
चांगला भाव मिळण्याची अपेक्षा
सोयाबीन पिकाची यावर्षी प्रचंड भाववाढ झाली आहे. त्यामुळे सोयाबीन पिकावर शेतकरी लक्ष देत आहे. १० हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल भाव गेला होता. त्यामुळे यावर्षी चांगला भाव राहील असा अंदाज बांधून पिकावर फवारणी करण्यासाठी मोठा खर्च केला जात आहे.