ग्रामपंचायत निवडणूक कर्मचाऱ्यांची पथके रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:15 AM2021-01-15T04:15:28+5:302021-01-15T04:15:28+5:30
तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींपैकी १० ग्रा.पं. व अन्य ग्रामपंचायतींतील ३३ असे एकूण १०९ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आल्याने ६० ग्रामपंचायतींच्या ...
तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींपैकी १० ग्रा.पं. व अन्य ग्रामपंचायतींतील ३३ असे एकूण १०९ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आल्याने ६० ग्रामपंचायतींच्या १८४ प्रभागांतील ४८१ जागांसाठी १०८२ उमेदवारांत लढत होत आहे. यात ५९८ महिला उमेदवारांचा समावेश असून १५ जानेवारी रोजी १९० मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. १९० मतदान केंद्रांवर केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, पोलीस कर्मचारी अशा प्रत्येकी ५ कर्मचाऱ्यांप्रमाणे एकूण ९५० कर्मचारी नियुक्त करून मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले आहेत. तर १०० कर्मचारी राखीव ठेवण्यात आले असून १६ झोनल अधिकारी, २० मास्टर ट्रेनर, साहित्य स्वीकृती टेबलवर १०० कर्मचारी, २५ निवडणूक निर्णय अधिकारी व २५ साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सज्ज असल्याची माहिती तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी दिली.