सापाची कात निघाल्याने प्रांगणात भरविला वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:19 AM2021-09-27T04:19:22+5:302021-09-27T04:19:22+5:30
कोरोनामुळे दीड वर्षांपासून बंद असलेली खळी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा १८ सप्टेंबरपासून गट शाळा पद्धतीने भरविली जात ...
कोरोनामुळे दीड वर्षांपासून बंद असलेली खळी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा १८ सप्टेंबरपासून गट शाळा पद्धतीने भरविली जात आहे. वर्ग खोल्यांच्या भिंतीला भेगा पडण्याबरोबर फरशीला ही बिळे पडल्याने धोकादायक वर्गात बसून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. दोन दिवसांपासून पावसाने तालुक्यात सर्वदूर हजेरी लावल्याने खळी गावात चिखल, पाणी साचले आहे. २४ सप्टेंबर रोजी सकाळी सेविका अनिता राकीले या शाळेत आल्यानंतर वर्ग खोल्या झाडत असतांना वर्ग ४च्या खोलीत त्यांना सापाची मोठी कात दिसून आली. घाबरलेल्या अनिता राकीले यांनी ही बाब शिक्षिका पद्मिन सूर्यवंशी यांना सांगितली. वर्ग खोलीतील मोठ्या बिळामुळे सुंदर राकीले यांनी चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा वर्ग प्रांगणात भरविला. प्राथमिक शाळेच्या वर्ग खोल्यांच्या भिंतीला गेलेले तडे व फरशीला पडलेली बिळे बुजवून इमारतीची दुरुस्ती करावी, अशी मागणी पालकांतून केली जात आहे.